Sanjay Raut, Balasaheb Thackeray  Raj Thackeray
Sanjay Raut, Balasaheb Thackeray Raj Thackeraysarkarnama

बाळासाहेबांसारखीच व्यंगचित्रकलेची ज्यांच्यामध्ये क्षमता होती, त्यांनी भोंग्याचं राजकारण सुरु केलयं!

"काहीनी व्यंगचित्रकाराची लाइन सोडून दुसरी लाइन धरली,"
Published on

मुंबई : राज्यात सध्या भोंगे, हनुमान चालीसा यावरुन यावरुन राजकारण पेटलं आहे. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शाब्दीक चिमटा काढला आहे. "काहीनी व्यंगचित्रकाराची लाइन सोडून दुसरी लाइन धरली," असल्याचा टोमणा राज ठाकरेंचे (Raj Thackeray) नाव न घेता राऊतांनी लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले,"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी व्यगंचित्रकार म्हणून देशाचं राजकारण बदललं, नवीन निर्माण केलं. नाठाळांना वठणीवर आणलं. व्यगंचित्रकला ही देशात नष्ट होत चाललेली कला आहे, आर.के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर या क्षेत्रात प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे,"

Sanjay Raut, Balasaheb Thackeray  Raj Thackeray
मांजरीच्या उपसरपंचावर गोळीबार ;विटा, दगडांनी हल्ला

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार निर्माण व्हावा, अशी आम्ही देवाकडे नेहमी प्रार्थना करतो. व्यंगचित्रकलेची ज्यांच्यामध्ये क्षमता होती असं आम्हाला वाटायचं, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्याचं राजकारण सुरु केलं," असा टोला राऊतांनी लगावला.

'बिटवीन द लाईन' हा बाळासाहेबांचा शब्द होता. व्यंगचित्रकाराला 'बिटवीन द लाईन' वाचता आले पाहिजे. आता लाईनही वाचता येत नाही, आणि लाइनही बदलतात," अशा शब्दात राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं.

Sanjay Raut, Balasaheb Thackeray  Raj Thackeray
भोंग्यांचा आवाज किती ठेवावा ? ; संजय पांडेंकडून धर्मगुरूंना सूचना

"बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांनी कुणालाही सोडलं नाही.कुंचला आणि वाणी या दोन अमोघ शस्त्रांनी बाळासाहेबांनी देशात सत्ता परिवर्तन केलं. ही कुंचल्याची ताकद आहे. आजही आम्ही कुंचल्यापुढे नतनस्तक होतो. बाळासाहेबांप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार निर्माण व्हावा, अशी आम्ही देवाकडे नेहमी प्रार्थन करतो. व्यंगचित्रकलेची ज्यांच्यामध्ये क्षमता होती असं आम्हाला वाटायचं त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्याचं राजकारण सुरु केलं,"असे राऊत म्हणाले.

आज राऊत हे पुणे दौऱ्यावर आहेत. याबाबत ते म्हणाले,"संघटनात्मक बांधणीसाठी आमचे दौरे आहेत. जे कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत ते आम्ही करत आहोत. १४ तारखेला बीकेसीमध्ये शिवसेनेची मोठी सभा आहे. संभाजीनगरला आठ तारखेला सभा आहे. त्याची तयारी सुरू आहे," "कोणी किती भोंगे आपटले भोंगे लावले तरी त्याचा परिणाम आमच्या संघटनात्मक कामांमध्ये होणार नाही शिवसेना काय करते हे महाराष्ट्राच्या जनतेला हिंदू समाजाला चांगलं माहित आहे," असे राऊतांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com