Prashant Kishor on Cockroach Janata Party sarkarnama
देश

Prashant Kishor Video : काॅक्रोच पार्टी सरकारसाठी धोक्याची घंटा, प्रशांत किशोर यांनी दिला इशारा, म्हणाले, 'चिंतेचा विषय लोकं...'

Prashant Kishor on Cockroach Janata Party : काॅक्रोच जनता पार्टी विषयी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे भाष्य केले आहे. सरकारची चिंता वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Roshan More

Prashant Kishor News : सोशल मीडियावर काॅक्रोच जनता पार्टी ट्रेंडमध्ये आहे. तब्बल दोन कोटी लोक ऑनलाईन पद्धतीने या पार्टीशी जोडले आहेत. अजून पक्ष म्हणून याची नोंद झाली नाही. मात्र, सोशल मीडियावर येवढ्या मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळत असल्याने सरकारविषयी रोष असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या विषयी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले, काॅक्रोच पक्षा विषयी आपण बोलतोय ते कॅम्पेन सोशल मीडियावर कोणीतरी सुरु केले आहे. दोन कोटी लोक त्यांना ऑनलाईन पद्धतीने जोडले गेले आहेत. ते अजून अधिकृतरित्या राजकीय पक्ष नाहीत, त्यांची नीती काय, नेता कोण? याची माहिती नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'तब्बल दोन कोटी लोक एका प्लॅटफाॅर्मवर येत आपले म्हणणे सरकारसमोर ठेवत असतील तर हा सरकारसाठी चितेंचा विषय असला पाहिजे. यातून दिसते की सध्याच्या व्यवस्थेविषयी लोक किती नाराज आहेत. '

'बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, तेलाच्या वाढलेल्या किंमती, शेतकऱ्यांना न मिळणारी खतं यातून व्यवस्थेच्या विरोधात असंतोष दिसून येत आहे. त्यामुळेच हे परिवर्तन होताना दिसत आहे. त्यामधून जो कोणी हा प्लॅटफाॅर्म (काॅक्रोच पार्टी) सुरू केले त्याला दोन कोटी लोकांनी डिजीटली साईन केले.'

काॅक्रोच पार्टी कम बॅक

अभिजित दीपके यांनी शनिवारी ट्विट करत सांगितले की, 'माझे वैयक्तिक इंस्टाग्राम खाते हॅक झाले. ट्विटरने खाते निलंबित केले. बॅकअप खाते देखील बंद करण्यात आले.'Cockroach Janata Party' चे अधिकृत इंस्टाग्राम खाते हॅक करण्यात आले आहे. या खात्याचा ॲक्सेस आता आमच्यासाठी नाही.' दरम्यान, आज त्यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे की, आम्ही इन्स्टाग्रामवर परत आलो आहोत! अकाउंट रिकव्हर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT