Jansuraj Party on Bihar Assembly By-Election : बिहार पोटनिवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जनसुराज पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून 13 नोव्हेंबर रोजी बिहारच्या चार विधानसभा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या या मागणीवर निवडणूक आयोग सहमत नाही. यामुळेच आज जनसुराज पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांच्या जनसुराज पक्षाच्या मते बिहारमधअये पोटनिवडणुकीची तारीख पुढे ढकलली गेली पाहीजे. जनसुराज पक्षाच्यावतीने दाखल केल्या गेलेल्या याचिकेत बिहारमधील छठ पूजेचा हवाला देत पोटनिवडणुकीची तारीख 13 नोव्हेंबरवरून 20 नोव्हेंबर करण्याची मागणी केली गेली आहे.
निवडणूक आयोगाने(Election Commission) जनसुराज पक्षाची मागणी मान्य केली नाही आणि बिहारमध्ये पोटनिवडणुकीची तारीख पुढे ढकलली नाही. यानंतर निवडणूक आयोगाने निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जनसुराज पार्टीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवार 11नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
याचिकेत जनसुराज पार्टीने म्हटले आहे की, उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमध्ये निवडणुकीची तारीख धार्मिक उत्सवाच्या आधारावर निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. तर बिहारमध्ये छठ पूजेसारखे मोठे पर्व असूनही पोटनिवडणुकीची तारीख पुढे ढकलली गेली नाही. याचिकेनुसार निवडणूक आयोगाचे बिहारमधील निवडणूक स्थगित करण्याच्या मागणीवर विचार न करणे अन्यायकारक आणि घटनेच्या कलम 14 अंतर्गत समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन देखील आहे.
बिहारच्या चार विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. बेलागंज, इमामगंज, रामगढ आणि तरारी येथे जवळपास एक वर्षासाठी नवीन आमदार निवडला जाणार आहे. यानंतर बिहारमधील विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येईल आणि पुन्हा विधानसभा निवडणूक होईल. या चार मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जनसुराज पार्टी चारही जागांवर निवडणूक लढवत आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा जनसुराज पार्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. अशावेळी पार्टी मतदानाच्या आधीच आपले अस्तित्व दर्शवू इच्छित आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.