Election Commission News : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यांवर निवडणूक आयोगाची कडक भूमिका; अधिकाऱ्यांना दिले 'हे' निर्देश!

Chief Election Commissioner Rajeev Kumar : विरोधकांना कमी लेखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे खालच्या पातळीवरील आरोप झाले नाही पाहिजेत, असंही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.
Rajeev Kumar
Rajeev KumarSarkarnama
Published on
Updated on

CEC Rajeev Kumar on Insulting women by leaders : मुख्य निवडणूक आयुक्त(CEC) राजीव कुमार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महिलांविरोधात राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या अपमानस्पद वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, याची निंदाही केली आहे. एवढंच नाहीतर राजीव कुमार यांनी अधिकाऱ्यांना अशा वक्तव्यांविरोधात त्याचवेळी कडक कारवाई करण्याचेही स्पष्ट निर्देश दिले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालायतील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका समीक्षा बैठकीदरम्यान राजीव कुमार यांनी महिलांचा सन्मनाविरोधात वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद भाषेवर नाराजी व्यक्त केली. बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि रिटर्निंग अधिकारी हजर होते.

Rajeev Kumar
Aziz Basha and Government of India Case : 'AMU'बाबत 1967चे अजीज बाशा विरुद्ध भारत सरकार प्रकरण नेमके काय आहे?

निवडणूक आयुक्तांनाही राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी महिलांच्या सन्मानास धक्का पोहचवणारी कोणतीही विधानं करू नये. त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, नेते किंवा अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खासगी आयुष्यातील कोणत्याही मुद्य्यावर टीका नाही झाली पाहीजे. विरोधकांना कमी लेखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे खालच्या पातळीवरील आरोप झाले नाही पाहीजेत.

Rajeev Kumar
Vanchit Bahujan Aaghadi : 'वंचित'च्या 'या' निर्णयामुळे भाजपला दिलासा अन् काँग्रेसचं वाढणार टेन्शन?

याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार(Rajeev Kumar) यांनी हेही स्पष्ट केले आहे की, उमेदवार किंवा राजकीय नेत्यांद्वारे महिलांच्या सन्मानाविरोधात केल्या जाणाऱ्या कोणत्याही टिप्पणीवर निवडणूक आचारसंहितेच्या तरतूदीनुसार कडक कारवाई केली गेली पाहीजे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की सर्व उमेदवार आणि पक्षनेते आपली भाषणं आणि सार्वजनिक संवादात महिलांबाबत आदर दर्शवत आपली वर्तवणूक सुधारतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com