President Approves Delhi Service Bill : Sarkarnama
देश

Delhi Service Bill| ब्रेकींग : दिल्ली सेवा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी!

President Approves Delhi Service Bill : दिल्ली सेवा विधेयकाला राष्ट्रपतींची स्वाक्षरी केली करून मंजूर केले

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या अधिकाराशी संबंधित असलेले 'दिल्ली सेवा बिल' लोकसभेत आवाजी मतदानानंतर मंजूर करण्यात आले होते. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडले होते. यावेळी सभापतींनी मतदान प्रक्रिया घेतली. मतदान यंत्रात बिघाड झाल्याने चिठ्ठीद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले होते. आता दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी करून, विधेयकाला मंजुरी दिली आहे, या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. (Latest Marathi News)

दिल्ली सेवा विधेयक(Delhi Service Bill) लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. त्या पाठोपाठ विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडले गेले. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने या विधेयकाला विरोध केला होता. दोन्ही पक्षांकडून राज्यसभेच्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आले होते. काँग्रेस आणि 'आप'ने (AAP) त्यांच्या राज्यसभा खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

राज्यसभेत सेवा बिलाच्या बाजूने १३१ तर १०२ विरोधात मतदान झाले होते. यामुळे २९ मताने दिल्ली सेवा बिल पारित करण्यात आले. लोकसभेबरोबरच आता राज्यसभेतही हे बिल मंजूर झाला होता. यामुळे केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यासाठी मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT