Sharad Pawar - Fadnavis News: शरद पवार-देवेंद्र फडणवीस येणार एकाच मंचावर; एकमेकांविषयी काय बोलणार?

Sharad Pawar In Solapur : या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Sharad Pawar  Devendra Fadnavis
Sharad Pawar Devendra Fadnavissarkarnama

Solapur News : पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उपस्थिती लावली होती. सोबतच व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा कार्यक्रम नुकताच पार पडला होता. यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार आणि फडणवीस पुन्हा एकदा एका मंचावर येणार आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar  Devendra Fadnavis
Ahmednagar Politics : 'फडणवीस म्हणतात वादग्रस्त विधाने करणाऱ्यांची गय नाही, नगरमध्ये मात्र..'; कळमकरांनी घेरले!

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे येत्या रविवारी (ता. १३ रोजी) अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सांगोल्यात एकाच मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीचा एक गट फुटल्यानंतर आणि पुण्यातील कार्यक्रमानंतर शरद पवार फडणवीस हे दोन नेते प्रथमच पुन्हा एकत्रित येणार आहेत.

Sharad Pawar  Devendra Fadnavis
Thane Politics : अजित पवारांसोबत मुंब्य्रातील १२ नगरसेवकांची 'दावत'; आव्हाडांना दुसरा झटका

या पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलताना दोन्ही नेते एकमेकांविषयी काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सांगोल्याचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे रविवारी अनावरण करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com