PM Narednra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा

Narendra Modi Submitted his Resignation as Prime Minister to the President : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमताचा आकडा पार केल्याने नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यादां पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Rajanand More

PM Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर केला आहे. नवीन सरकार येईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असतील.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३९२ तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एनडीएची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार बुधवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

प्रस्तावाला कॅबिनेटने मंजूरी दिल्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आला. त्याला राष्ट्रपतींनीही मंजूरी दिली. राष्ट्रपतींनी राजीनामा मंजूर केल्यानंतर मोदींना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याची विनंती केली.

दरम्यान, आज दिल्लीत एनडीएची बैठक आहे. आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ते दोघेही सरकारमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

इंडिया आघाडीची आज बैठक होणार आहे. या बैठकीला आघाडीतील सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी आघाडीतील काही नेत्यांनी सत्तास्थापनेबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचेही म्हटले होते. त्यानुसार बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT