Modi Government : लोकसभा आजच विसर्जित होणार? शपथविधीची तारीख ठरली

Lok Sabha Election 2024 Result PM Narendra Modi NDA Vs India Alliance : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची अखेरची कॅबिनेट बैठक आज होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव आणला जाऊ शकतो.
PM Narendra Modi Cabinet
PM Narendra Modi CabinetSarkarnama

Delhi Political Updates : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील राजकीय हवा चांगलीच तापली आहे. बुधवारी दिल्लीत एनडीएसह इंडिया आघाडीच्या बैठकांसह मावळत्या कॅबिनेटची अंतिम बैठकही होऊ शकते. या बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. हा प्रस्ताव आजच राष्ट्रपतींनाही सादर करून नव्या सरकारच्या शपथविधी मार्ग मोकळा केला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी आठ जूनला होण्याची शक्यता आहे.

एनडीएने बहुमताचा 272 चा आकडा पार केला आहे. मात्र, भाजपला स्वबळावर हा आकडा गाठता न आल्याने मित्रपक्षांवरच मोठी भिस्त राहणार आहे. एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीने 234 पर्यंत मजल मारली. आघाडीतील काही नेत्यांकडून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले जातील, असे संकेत दिले आहेत.

एनडीएमध्ये किंगमेकर ठरलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना चुचकारण्याचा प्रयत्न आघाडीकडून केला जाऊ सकतो. मात्र, त्यांनी आपण एनडीएसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट करून भाजपला मोठा दिलासा दिला आहे.

एनडीएच्या बैठकीत हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. आजच्या बैठकीतच मोदींच्या शपथविधीची तारीख निश्चित केली जाऊ शकतो. एनडीएकडून आज सत्तास्थापनेचा दावा केला जाईल आणि आठ जूनला शपथविधी होईल, अशा चर्चा दिल्लीत सुरू आहेत.

PM Narendra Modi Cabinet
Share Market Crash : निवडणूक निकालांनी 43 लाख कोटींचा चुराडा; बाजारात ऐतिहासिक घसरण

कॅबिनेटची अखेरच्या बैठकीत आज लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो राष्ट्रपतींकडे सादर केला जाईल. राष्ट्रपतींनी त्याला मंजूरी दिल्यानंतर राष्ट्रपती भवनात मावळत्या सरकारला राष्ट्रपती निरोप देतील. या सर्व घडामोडी एक-दोन दिवसांतच होण्याची शक्यता आहे.

इतिहास घडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर इतिहास घडले. 1962 नंतर सलग तिसऱ्यांदा एकाच व्यक्तीने पंतप्रधानपद भुषविले नाही. मनमोहन सिंग यांनी 2004 आणि 2009 अशी सलग दोनदा शपथ घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दोन टर्मनंतर तिसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com