Supreme Court News : सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटने घेतला होता. या निर्णयावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची स्वाक्षरी झाली आहे. राष्ट्रपती मूर्मू यांनी आज केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयाला मंजूरी दिली. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या 33 वरून वाढून 38 होणार आहे.
केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, यासाठी अध्यक्षादेश जारी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट अधिनियम, 1956 मध्ये दुरुस्ती करण्यात आली.
न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 (मुख्य न्यायाधीश धरून 38) करण्याचा निर्णयाच्या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटने 5 मे रोजी मंजूरी दिली होती. त्या निर्णयावर आता राष्ट्रपतींकडून देखील मंजुरी देण्यात आली आहे.
सरकारनुसार न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भात निवेदन करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले आहे की, या विस्ताराचा मुख्य उद्देश सर्वोच्च न्यायालयाला अधिक सक्षम बनवणे आणि नागरिकांना लवकर न्याय मिळवून देणे हा आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या 92 हजार पेक्षा अधिक झाली आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 124(1) नुसार संसदेला अधिकार आहे की ती कायदा करून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निश्चित करू शकते. वाढत्या खटल्यांचा आणि कामाच्या वाढत्या बोझ्याचा विचार करून गेल्या काही दशकांत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.