President Droupadi Murmu Sarkarnama
देश

Parliament Session Live : राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणाआधी ‘आप’चा मोठा निर्णय

President Droupadi Murmu Lok Sabha Session AAP : संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करणार आहे. १८ व्या लोकसभेचे हे पहिलेच अधिवेशन आहे.

Rajanand More

New Delhi : संसदेच्या अधिवेशनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरूवात होणार  आहे. राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना संयुक्तपणे संबोधित करतील. मात्र, त्याआधीच आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी सीबीआयने अटक केली आहे. या अटकेचा निषेध म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आपने घेतला आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात आप केजरीवालांच्या अटकेवरून आक्रमक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आपच्या भूमिकेवर बोलताना सूचक विधान केले आहे. देशातील हुकूमशाहीला राष्ट्रपतीही जबाबदार आहेत. त्यांनी सरकारच्या या गोष्टींना थांबवायला हवे, असे राऊतांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेकडूनही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

आपचे खासदार संदीप पाठक यांनी सांगितले की, आज आम्ही राज्यसभेत आंदोलन करणार आहोत. तसेच राष्ट्रपतींच्या भाषणावरही बहिष्कार टाकला जाईल. राष्ट्रपती आणि संविधान सर्वोच्च आहे. न्यायाच्या नावाखाली हुकूमशाही सुरू असेल तर त्याविरोधात आवाज उठवायला हवा. याबाबत इंडिया आघाडीतील इतर पक्षांसोबत चर्चा झालेली नाही. पण आमचा पक्ष मात्र बहिष्कार टाकणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT