PM Modi called Manu Bhaker Sarkarnama
देश

PM Modi called Manu Bhaker - Video : ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या मनू भाकेरला थेट पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Manu Bhaker won bronze medal In Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला 10 मीटर एअर पिस्टल क्रीडा प्रकारात नेमबाज मनु भाकेर हिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. ही कामगिरी करणारी मनू भाकेर ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

शिवाय तिने जिंकलेल्या कांस्य पदाकमुळे या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकाचे खातेही उघडले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वत: मनू भाकेर हिला फोन केला आणि विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांमधील संवादाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

पंतप्रधान मोदी(PM Modi) फोनवर म्हणाले, तुझे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. तुझ्या यशाची बातमी ऐकल्यापासून मी उत्साहात आणि आनंदात आहे. तसं तर केवळ पॉइंट वन गुणाने तुझं रौप्य पदक हुकलं. परंतु तरीही तू आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आहेस. तुला दोन प्रकारे क्रेडिट मिळत आहे, एक म्हणजे तू कांस्यपदक जिंकलं आहेस आणि भारताची पहिली महिला देखील बनली आहे जिने शुटींगमध्ये पदक मिळवलं आहेस. माझ्याकडून तुला शुभेच्छा आहेत.

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हणाले की, टोकिओ ऑलिम्पिकमध्ये रायफलने तुला दगा दिला होता. परंतु यंदा तू सर्व कसर भरून काढलीस. मला पूर्ण खात्री आहे की यापुढेही तू दमदार कामगिरी करशील. सुरुवात खूप चांगली झाल्याने तुझा उत्साह देखील वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल, यामुळे देशालाही फायदा होईल.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला 10 मीटर एअर पिस्टल या क्रीडा प्रकारात मनू भाकेर हिने कांस्यपदक जिंकल्याबद्दल तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदींशिवाय राष्ट्रपीत द्रौपदी मुर्मू यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे यश बाकीच्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे. भारताला मनू भाकेरवर गर्व आहे, तिचे यश विशेषकरून महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल. भविष्यातही तिने यशाची अनेक उत्तुंग शिखरं गाठावीत अशी मी मनोकामना व्यक्त करते. अशाप्रकारे राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT