Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा; नितीशबाबू, लालूंना ‘दे धक्का’

Bihar Politics Political Party Assembly Election : बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक आता तिरंगी होणार आहे.
Nitish Kumar, Prashant Kishor, Lalu Prasad Yadav
Nitish Kumar, Prashant Kishor, Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Patna : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे रविवारी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत एनडीए विरुध्द इंडिया आघाडी अशा वाटणाऱ्या या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनीही उडी घेतली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ते राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.

प्रशांत किशोर यांनी रविवारी पटना येथे जनसुराज्य अभियानच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना हे जाहीर केले. प्रशांत किशोर यांच्या राजकीय पक्षामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचेही टेन्शन वाढणार असल्याचे मानले जात आहे. प्रामुख्याने इंडिया आघाडीला सर्वाधिक फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे.

Nitish Kumar, Prashant Kishor, Lalu Prasad Yadav
Akhilesh Yadav : पुतण्याने काकांना पुन्हा डावललं; अखिलेश यांनी खेळलं ब्राम्हण कार्ड

पक्षाचे नेतृत्व आपण करणार नसल्याचेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. आपला पक्ष 2025 मध्ये जनतेचे राज्य आणेल. रोजगारासाठी बिहार सोडून इतर राज्यांत जाणाऱ्या लोकांना आपल्याच राज्यात रोजगाराची संधी मिळेल, यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील. पुढील काळात बाहेरील लोक बिहारमध्ये नोकरीच्या शोधात येतील, असा दावाही त्यांनी केला.

लोकांना आता पर्याय असून या शोधात असलेले लोक आता एकत्रित आल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता लोकांना असल्याने सर्वजण एकत्र येत आहेत. बिहारी म्हणून ज्यांना अपमानित केले जात होते, तेच चांगली यंत्रणा तयार करू शकले असते. आम्ही अशी यंत्रणा तयार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nitish Kumar, Prashant Kishor, Lalu Prasad Yadav
Rahul Gandhi : दिल्लीतील घटनेवर राहुल गांधी संतापले; सरकारच्या बेफिकिरीला फटकारले

नितीश कुमार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, 2015 मध्ये त्यांच्या प्रचारासाठी इथे आलो होतो. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यावेळी सभागृहात 2 हजार 200 लोक होते. आपण दहावेळा हे सभागृह भरू, असे सांगत प्रशांत किशोर यांनी नितीशबाबूंना एकप्रकारे आव्हान दिले आहे.

दरम्यान, बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, नितीश कुमार यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला. त्यामुळे नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली भाजप आगामी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशांत किशोर यांच्याकडून त्यांच्यासमोर आव्हान उभे केले जाऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com