Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi News : पंतप्रधान मोदींनी लाँच केली 'अमृत भारत स्टेशन योजना'; 508 स्टेशनांचा होणार पुनर्विकास!

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज रविवारी ( ता. 6 ऑगस्ट) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेची घोषणा केली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. ही 508 रेल्वे स्थानके 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. यामुळे रेल्वे वाहतूकीत देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल भारताने टाकले आहे. (Latest Marathi News)

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, "जगातील रेल्वेचे जाळे जितके दक्षिण आफ्रिका, युक्रेन, स्वीडन, ब्रिटन यांसारख्या देशांमध्ये आहे तितके एकट्या भारताने 9 वर्षात रेल्वे ट्रॅक बांधले आहेत. यातून देशाचे उद्दिष्ट हे प्रवास अतिशय सुलभ आणि आनंददायी करणेदेखील आहे. प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी उत्तम प्रतीक्षालय बनवण्यात येत आहेत. हजारो स्थानकांवर मोफत इंटरनेट उपलब्ध असेल."

पुनर्विकासासाठी 25 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत :

पंतप्रधान म्हणाले , "विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल करणारा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतकालाच्या आरंभाच्या टप्प्यावर आहे. भारताचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. 1300 रेल्वे स्थानकांपैकी 508 अमृत भारत रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यावर 25 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत."

नरेंद्र मोदी म्हणाले की, "30 वर्षांत प्रथमच देशात पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाले आहे. जगभरात भारताची विश्वासार्हता वाढलेली आहे. भारताच्या अमृतकालच्या सुरुवातीला या ऐतिहासिक कार्यासाठी मी रेल्वे मंत्रालयाचे कौतुक करतो आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. आज संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत. जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता वाढली आहे. भारताविषयी जगाचा दृष्टिकोन बदलण्याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भारतातील जनतेने तीन दशकांनंतर पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. यानंतर पूर्ण बहुमताच्या सरकारने स्पष्टपणे मोठे निर्णय घेतले."

विरोधकांवरही हल्लाबोल केला :

"मोदींनी यावेळी विरोधकांवरही हल्लाबोल केला. स्वतः काही करणार नाही आणि दुसऱ्यांनाही काही करू देणार नाही. संसदेच्या नवीन इमारतीला विरोधी पक्षांनी विरोध केला. ७० वर्षांत शहिदांचे युद्ध स्मारकही त्यांनी केले नाही. स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे गेले नाहीत," असे पंतप्रधान म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT