Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Ichalkaranji News : इचलकरंजीसाठी मोठी बातमी; मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष,कागलमधील नेत्यांच्या उपस्थितीत होणार बैठक

Water Scheme : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर विरोधक भाजप नेते समरजितसिंह घाटगे हे इचलकरंजीच्या पाणी योजनेला विरोध करण्यासाठी एकत्र आले होते.

Ichalkaranji : इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुळकूट योजनेला कागल तालुक्यातून प्रचंड विरोध होत आहे. इचलकरंजीला पाणी न देण्यासाठी सर्वपक्षीय आणि कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. मात्र, इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. (Chief Minister Eknath Shinde paid attention to the water issue of Ichalkaranji)

इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी स्वतः बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे इचलकरंजीतील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आडवाआडवीच्या पाणी प्रश्नात मार्ग निघेत आणि शहराला पाणी मिळेल, अशी आशा इचलकरंजीच्या नागरिकांना वाटू लागली आहे.

Eknath Shinde
Konkan Politics : कोकणात 'आयाराम-गयाराम' सुरू ; तुम्ही एक नगरसेवक फोडला, आम्ही तीन फोडले !

उद्योगनगरी असलेल्या इचलकरंजी शहराला पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. पंचगंगा नदी शहराच्या जवळून वाहते. मात्र, नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित आहे, त्यामुळं रोगराई पसरते. इचलकरंजीला बाहेरून पाणी आणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्य सरकारने दूधगंगा नदीतून पाणी आणण्यासाठी योजना मंजूर केली आहे. ती योजना सुळकूट येथून होणार आहे. मात्र, कागल तालुक्यातील लोकांचा विरोध आहे. जनतेच्या सोबत सर्वपक्षीय लोकही एकत्र आले आहेत. त्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) आणि त्यांचे कट्टर विरोधक भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांचाही समावेश आहे.

Eknath Shinde
Sharad Pawar News : यशवंतराव चव्हाण यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली होती; पवारांनी सांगितली 'ती' आठवण

या पार्श्वभूमीवर इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची विनंती केले. ती मान्य करून मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत बैठक घेऊ, असं सांगितलं आहे. या बैठकीला कागल तालुक्यातील राजकीय नेतेही उपस्थित राहतील, त्यामुळे या योजनेबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश कागलमधील नेत्यांना डावलता येणे कठीण आहे, त्यामुळे इचलकरंजीकराचा पाणी प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com