<div class="paragraphs"><p>Omicron</p></div>

Omicron

 
Sarkarnama
देश

ओमिक्रॉनचा धोका वाढला; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 213 झाली आहे. सर्वाधिक रुग्ण दिल्लीत असून, त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. यामुळे या दोन राज्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तातडीने आढावा बैठक बोलावली असून, या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने संसर्ग होणारा आहे. यामुळे केंद्रासह राज्यांच्या आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. केंद्र सरकार यामुळे खडबडून जागे झाले आहे. पंतप्रधान मोदींना यासाठी तातडीने आढावा बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या (ता.23) होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकार संसर्ग रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णसंख्येने आता दोनशेचा टप्पा पार केला आहे. यातील 77 रुग्ण बरे झालेले आहेत. सर्वाधिक रुग्ण दिल्लीत 57 आहेत. यानंतर महाराष्ट्र 54, तेलंगण 24, कर्नाटक 19, राजस्थान 18, केरळ 15 आणि गुजरात 14 अशी रुग्णसंख्या आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 317 नवीन रुग्ण सापडले. देशातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची 3.48 कोटी आहे. सध्या सक्रिय रुग्ण 78 हजार 190 आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळे 318 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 4.78 लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, अशी माहिती नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीने केंद्र सरकारला दिली आहे. या समितीचे अध्यक्ष हे प्रा. विद्यासागर हे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल. सध्या देशात दररोज कोरोनाचे साडेसात हजार रुग्ण सापडत आहेत. डेल्टाच्या जागा ओमिक्रॉनने घेतल्यानंतर ही संख्या वाढेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT