PM Modi Sarkarnama
देश

PM Modi on Union Budget 2024 : तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची विशेष प्रतिक्रिया, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Union Budget 2024 News : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. अर्थमंत्री म्हणून हा त्यांनी हा सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावर आता सर्वचस्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही अर्थसंकल्पावरील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पंतप्रधान मोदी(Narendra Modi) म्हणाले, मागील दहा वर्षांमध्ये 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हा अर्थसंकल्प नव्या मध्यवर्गाच्या सशक्तीकरणासाठी आहे. तरुणांना या अर्थसंकल्पामधून अपार संधी मिळणार आहेत. या अर्थसंकल्पातून शिक्षण कौशल्यांना नवा आयाम मिळेल. हा अर्थसंकल्प नव्या मध्यमवर्गास ताकद देईल. अर्थसंकल्प महिला, छोटे उद्योजक आणि एमएसएमई यांना मदत करेल.

त्यांनी पुढे म्हटले की, हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक वर्गास शक्ती देणारा आहे. हा अर्थसंकल्प गाव, गरीब, शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाणारा आहे. मागील दहा वर्षांमध्ये 25 कोटी लोक गरिबातून बाहेर आले आहेत. हा Neo Middle Class च्या सशक्तिकरणाच्या निरंतरतेचा अर्थसंकल्प आहे. हा तरुणांना असंख्य नव्या संधी देणारा अर्थसंकल्प आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, 'या अर्थसंकल्पातून शिक्षण आणि कौशल्याला नवी पातळी मिळेल. हा मध्यवर्गीयांना नवी ताकद देणारा अर्थसंकल्प आहे. हा जातीजमाती, दलित आणि मागासांना सशक्त करण्याच्या मजबूत योजनांसह आला आहे. या अर्थसंकल्पातून महिलांना आर्थिक भागिदारी सुनिश्चित करण्यास मदत मिळेल.'

पंतप्रधान मोदींनी दावा केला की, या अर्थसंकल्पामुळे छोटे व्यापारी, MSMESला विकासाचा नवा मार्ग मिळेल. अर्थसंकल्पात मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर दिला गेला आहे. यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळेल. आपाल्याला प्रत्येक शहर, प्रत्येक गाव, प्रत्येक घरात उद्योजक घडवायचे आहेत. यामुळे छोटे उद्योजक विशेषकरून महिला, दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबांमध्ये स्वरोजगारास बळ मिळेल.

पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, आजचा अर्थसंकल्प नव्या संधी, नवी उर्जा घेऊन आला आहे. तसेच हा मोठ्याप्रमाणात नवीन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी आणि चांगल्या वाढीस उत्तम भविष्य घेऊन आलेला अर्थसंकल्प आहे. त्यांनी असाही दावा केला की आजचा अर्थसंकल्प भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक ताकद बनवण्याच्या प्रक्रियेत उत्प्रेरकाचे काम करेल, विकसित भारताचा मजबूत पाया रचेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT