Narendra Modi And Donald Trump Sarkarnama
देश

PM Modi's US Visit : PM मोदींचा अमेरिका दौरा भारतासाठी ठरणार खास; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

PM Modi Narendra Modi America Tour : ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळात शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे.

Rashmi Mane

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मोदींच्या 3.O मधील हा त्यांचा दुसरा दौरा असणार आहे. तसे तर मोदी हे आठव्यांदा अमेरिकेला जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 13 फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये भेट घेणार आहेत. ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळात शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे.

दोन्ही नेत्यांमधील ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. वॉशिंग्टनमधील या बैठकीत भारत-अमेरिका धोरणात्मक संबंध मजबूत करण्यावर भर असणार आहे. विशेषतः व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा सहकार्य यासारख्या क्षेत्रात त्याचा फायदा असेल.

कसा असेल अमेरिका दौरा?

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आज रात्री उशिरा म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनला पोहोचतील. दुसऱ्या दिवशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा करतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. शपथविधीनंतर, पंतप्रधान मोदींनी 27 जानेवारी रोजी त्यांच्याशी संवाद साधला ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी व्यापार, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

शुल्कांवर काही चर्चा होईल का?

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सत्तेत आल्यापासून त्यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनसारख्या देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादले आहेत. भारतावर कर लादण्याच्या मुद्द्यावरही ट्रम्प यांचे धोरण कठोर राहिले आहे. परंतु आतापर्यंत ट्रम्प यांनी भारतावर कोणताही कर लादलेला नाही. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये टॅरिफबाबत चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे.

ट्रम्प अमेरिकन उद्योगपतींशीही चर्चा करू शकतात ज्यात अब्जाधीश उद्योगपती आणि ट्रम्पच्या टीममध्ये DOGE चे प्रभारी एलोन मस्क यांचा समावेश आहे. भारताच्या अजेंड्यात अणुऊर्जा क्षेत्रात अमेरिकेची गुंतवणूक देखील समाविष्ट आहे. पंतप्रधान मोदी 13 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांची भेट घेतील. यादरम्यान, ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT