PM Modi America Visit : मोदी 11 वर्षांत किती वेळा अमेरिकेला गेले; ट्रम्प यांच्यासोबत कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार?

PM Modi to Visit America After Donald Trump sworn : ट्रम्प यांच्या शपथ सोहळ्यासाठी मोदी यांना निमंत्रण नव्हते. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी स्वतः मोदी यांना फोन करुन अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे.
PM Modi to Visit America
PM Modi to Visit America Sarkarnama
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून (ता. 12) अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममधील मोदींचा हा दुसरा दौरा आहे. मोदी हे दहाव्यांदा अमेरिकेला जात आहेत. अमेरिकेला जाण्यापूर्वी दोन दिवस ते फ्रान्सला पण जाणार आहेत. आज ते एआय समिट कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

फ्रान्स दौऱ्यापेक्षा पीएम मोदी यांचा अमेरिका दौरा अधिक चर्चेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेला भेट देणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांची भेट घेतली आहे. पुढच्या आठवड्याती जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांचा अमेरिका दौरा आहे.

PM Modi to Visit America
Ranjana Desai: मोदींच्या होमटाऊनमध्ये सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींवर मोठी जबाबदारी; कोण आहेत रंजना देसाई

ट्रम्प यांच्या शपथ सोहळ्यासाठी मोदी यांना निमंत्रण नव्हते. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी स्वतः मोदी यांना फोन करुन अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यावरुन जागतिक राजकारणात मोदीचं किती वजन आहे, हे यावरुन लक्षात येते.

सर्वात जास्त वेळा अमेरिकेचा दौरा करण्यारे भारताचे पंतप्रधान अशी नोंद मोदी यांच्या नावावर आहे. गेल्या 11 वर्षांत मोदींचा हा दहावा अमेरिका दौरा आहे. यापूर्वी डाँ. मनमोहन सिंग यांनी 8 वेळा अमेरिकेला भेट दिली होती.

जागतिक राजकारणात भारताची प्रतिमा बदलली आहे. केवळ अमेरिकाच नाही तर अन्य देशातही भारताचे महत्व वाढले आहे. भारत 11 टक्के संरक्षण साहित्य अमेरिकेतून आयात करतो. यात लष्कराच्या हेलिकॅाप्टरचा समावेश आहे.

PM Modi to Visit America
Ranjana Desai: मोदींच्या होमटाऊनमध्ये सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींवर मोठी जबाबदारी; कोण आहेत रंजना देसाई

ट्रम्प यांच्यासोबत मोदींची ही आठवी भेट असेल. अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्यासाठी मोदींनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही दिवसापूर्वी अमेरिकेत 104 भारतीय नागरिक बैकायदा वास्तव्य करीत असल्याच्या आरोपातून करण्यात आला होता. त्यांना भारतात पाठवले होते. पण त्यावेळी मोदी यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, या मुद्यावर प्रतिक्रिया देऊन मोदी कुठल्याही तणाव निर्माण करण्याच्या विचारात नाही. अमेरिकेसोबत व्यापारी संबध अधिक मजबूत करण्यावरुन दोन्ही देशामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com