BJP MLA Pritam Lodhi seen in a viral video allegedly threatening a police officer after his son’s car accident sparked public outrage. This controversy has raised serious questions about misuse of power. Sarkarnama
देश

Pritam Lodhi Controversy : मुलाने भरधाव 'थार'ने 5 जणांना उडवलं, भाजप आमदाराने चौकशी करणाऱ्या पोलिसांचाच बाप काढला; म्हणाले, "तुमच्या..."

BJP MLA Pritam Lodhi son accident : एकीकडे आमदारांनी एसडीओपींना आमच्यावर खोटे आरोप केले, तर खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मुलाच्या थारने पाच जणांना उडवल्याता व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांवरच आमदारांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

Jagdish Patil

Pritam Lodhi son accident : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रीतम लोधी हे सध्या वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये त्यांनी एका पोलीस अधिकार्‍याला धमकी दिल्याचं दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या आमदार महोदयांच्या मुलाच्या भरधाव कारने पाच जणांना उडवलं आहे. याच प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांना त्यांनी धमकी दिल्यामुळे आमदाराच्या मुलासाठी वेगळा न्याय आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील करेरा येथील रस्त्यावरून जाणाऱ्या पाच जणांना भाजपचे आमदार प्रीतम लोधी यांचा मुलगा दिनेश लोधींच्या भरघाव थारने जोरदार धडक दिल्याची घटना 16 एप्रिल रोजी घडली. या अपघातानंतर आमदार लोधी यांनी फेसबुकवर पोस्ट करत घटनेतील पीडितांना न्याय मिळवून दिला पाहिजे असं म्हटलं होतं.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'एका आमदारासाठी त्याचा मुलगा किंवा कुटुंब प्रथम नसते. तर जनता ही सर्वोपरी आहे. पोलीस प्रशासनाने करेरा येथील पीडितांना न्याय मिळवून दिला पाहिजे.', त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात होते. मात्र, लोधी यांनी अचानक यू-टर्न घेत थेट पोलीस अधिकाऱ्यांनाच धमकी दिल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

प्रीतम लोधी यांनी करेराचे सब-डिव्हिजनल ऑफिसर ऑफ पोलीस आयुष जाखर यांना थेट इशारा दिला आहे. "करेराच्या एसडीओपी यांनी जे काही म्हटले आहे ते मला सहन होत नाही. त्यांनी माझ्या मुलाला पुन्हा इथे दिसायचं नाही असं म्हटलं आहे. मला एसडीओपींना विचारायचे आहे की, करेरा काय तुमच्या वडिलांचे आहे का?

सामान्यपणे मी असे बोलत नाही, पण आता मला हे स्पष्ट करायचे आहे की माझा मुलगा करेरामध्ये परत येईल आणि तो निवडणूकही लढवेल. तुमच्या वडिलांमध्ये हिंमत असेल, तर मला रोखून दाखवावं", अशा शब्दात लोधी यांनी आपल्या मुलाची बाजू घेत पोलिसांचा बाप काढल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, एकीकडे आमदार लोधी यांनी एसडीओपींना आमच्यावर खोटे आरोप केले, तर खपवून घेणार नाही आणि तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मुलाच्या थारने पाच जणांना उडवल्याता व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांवरच आमदारांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

पोलिसांकड दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, तक्रारदार संजय परिहार, आशिष परिहार आणि अंशुल परिहार यांच्यासह दुचाकीवरून तहसील कार्यालयाकडे जात होते. त्यांच्या पुढे सीता वर्मा आणि पूजा सोनी या दोन महिला रस्त्याने चालत होत्या. यावेळी मागून दिनेश लोधी हे काळ्या रंगाची थार अत्यंत वेगात आणि त्यांनी आधी दोन महिलांना आणि त्यानंतर दुचाकीला धडक दिली, ज्यामध्ये पाचही जण जखमी झाले.

या घटनेनंतर जबाब देण्यासाठी आमदारांचा मुलाने ज्या थारने पाच जणांना उडवलं होतं. तिच गाडी घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये आले. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीला नंबर प्लेट नव्हती शिवाय काचांवर बेकायदेशीर काळी फिल्म लावली होती. त्यामुळे पोलिसांनी गाडीवर दंड ठोठावला. मात्र, या घटनेमुळे आता वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या आणि लोकांना भररस्त्यावर उडवणाऱ्या आपल्या मुलासाठी पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप आमदाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT