PMC News: श्रीनाथ भीमाले यांची अतिरिक्त आयुक्तांना ‘बैठकीत बघून घेतो’ची धमकी? सर्वसाधारण सभेत काय घडलं

PMC Row Shrinath Bhimale Vs Prasjit Nair news:महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यासाठी मोठे धोरण तयार केले आहे. या धोरणातून सुमारे १७०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
PMC Row Shrinath Bhimale Vs Prasjit Nair news
PMC Row Shrinath Bhimale Vs Prasjit Nair newsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे शहरातील जाहिरात फलक उभारण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावावरून पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा राडा झाला. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले ( Shrinath Bhimale) यांनी अतिरिक्त आयुक्त प्राजीत नायर यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यासाठी मोठे धोरण तयार केले आहे. या धोरणातून सुमारे १७०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असून, ४ हजारांहून अधिक जाहिरात फलक उभारले जाणार आहेत.

या प्रस्तावात संबंधित कंपन्यांनी महापालिकेला ३० टक्के महसूल देण्याची तरतूद आहे. मात्र, अतिरिक्त आयुक्त प्राजीत नायर यांनी या उत्पन्नाचे गणित जीएसटीच्या आधारे निश्चित करावे, असा मुद्दा उपस्थित केला. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि महापालिकेचे नुकसान होणार नाही, असे त्यांचे मत होते.

सभेदरम्यान श्रीनाथ भिमाले यांनी त्वरित प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली. मात्र, नायर यांनी त्यास नकार दिल्यानंतर वातावरण तंग झाले. त्याचवेळी भिमाले यांनी “बैठकीत बघून घेतो” अशी धमकी दिल्याचे सांगितले जाते.

PMC Row Shrinath Bhimale Vs Prasjit Nair news
Praniti Shinde News: महिला आरक्षणावर फडणवीसांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही बोलवा!

या घटनेमुळे आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram) देखील नाराज झाल्याची माहिती आहे. वाद वाढत असल्याने काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हा वाद वाढत असल्याने महापौर मंजूषा नागपुरे यांनी सभागृहनेते गणेश बिडकर यांना बोलावून घेऊन हे प्रकरण शांत केले.

PMC Row Shrinath Bhimale Vs Prasjit Nair news
Atul Save News : भाजपाच्या झेडपीतील शतप्रतिशत सत्तेला ठाकरेंच्या शिवसेनेचीच होती साथ, मंत्री अतुल सावे यांची जाहीर कबुली!

श्रीनाथ भिमाले यांनी मात्र कोणताही वाद किंवा धमकी दिल्याचे नाकारले असून, “माझ्याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे,” असे स्पष्टीकरण दिले आहे.

या धोरणात सार्वजनिक जागा, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, विद्युत खांब यासह अन्य ठिकाणी ४ हजार २२४ जाहिरात फलक लावले जाणार आहेत. या धोरणाला मान्यता मिळाल्यानंतर २ लाख ७१ हजार ५२ चौरस फुटाचे जाहिरात क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यामध्ये संबंधित कंपनी महापालिकेला ३० टक्के वाटा देणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com