Jairam Ramesh sarkarnama
देश

Jairam Ramesh update : जयराम रमेश यांच्या खासदारकीवर टांगती तलवार; 2023 मधील प्रकरण आलं बाहेर...

Privileges Committee Jairam Ramesh : राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये एकूण दहा सदस्य असतात.

Rajanand More

Rajya Sabha privilege panel : देशाचे माजी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे माजी सभापती जगदीप धनखड यांनी काही महिन्यांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्याविषयी अनेक गंभीर आरोप केले होते. राज्यसभेतही अनेकदा धनखड आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये खटके उडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावरून अनेक सदस्यांचे निलंबनही धनखड यांनी केले होते.

काँग्रेसचे नेते व राज्यसभेतील खासदार जयराम रमेश यांच्या धनखड यांच्याबाबतच्या एका विधानावरून मोठे वादळ उठले होते. त्याविरोधात भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी तक्रार केली होती. एप्रिल २०२३ मध्ये धनखड यांनी ही तक्रार विशेषाधिकार समितीकडे पाठविली. या तक्रारीचे समितीने गंभीरपणे दखल घेत कार्यवाही सुरू केली आहे.

काय म्हणाले होते जयराम रमेश?

जयराम रमेश यांच्याविरोधातील तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्यांनी राज्यसभा सभापतींविषयी अपमानकारक विधान केले. सभापतींनी सत्ताधाऱ्यांचे चिअरलीडर म्हणून काम करू नये, असे विधान जयराम रमेश यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच विधानामुळे काँग्रेस नेते अडचणीत आले आहेत. दरम्यान, त्यांनी सभापतींचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असा खुलासा जयराम रमेश यांनी समितीकडे केल्याचे वृत्त आहे.

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये एकूण दहा सदस्य असतात. सोमवारी झालेल्या समितीच्या बैठकीमध्ये सुधांशू त्रिवेदी, दीपक प्रकाश, कार्तिकेश शर्मा, सुरेंद्र सिंग नागर आणि जी. के. वासन उपस्थित होते, असे वृत्त एनएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या समितीपुढेच जयराम रमेश यांनी खुलासा केला आहे.

कोणती कारवाई?

समितीकडून सभापतींच्या विशेषाधिकाराचा भंग किंवा अवमान झाला आहे किंवा नाही, याची पडताळणी करेल. त्यामध्ये जयराम रमेश हे दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव सभागृहासमोर सादर केला जाईल. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास समितीच्या शिफारशीप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. या कारवाईमध्ये त्यांना ताकीद देणे, काही कालावधीसाठी सभागृहातून निलंबन, सदस्यपदावरून हकालपट्टी अशीही शिफारस केली जाऊ शकते. त्यामुळे जयराम रमेश यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असेल.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT