Priya Saroj-Rinku Singh Marriage Date Final : गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेली महिला खासदार अन् स्टार क्रिकेटरची जोडी अखेर या वर्षात लग्नबंधनात अडकणार आहे. अर्थात या खासदार म्हणजे समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज आणि स्टार क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. नुकताच त्यांचा साखरपुडाही पार पडला होता.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या एका हॉटेलमध्ये रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा पार पडला होता. यानंतर आता हे दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता लग्नाची तारीख फायनल झाली असून येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. दोन्ही कुटुंबांकडून या लग्नाची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनऊच्या सेंट्रम हॉटेलमध्ये पार पडला होता. दोन्ही कुटुंबिय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. आता साखरपुड्यानंतर विवाहाची तयारीनं वेग घेतला आहे.
रिंकू आणि प्रिया यांचा साखरपुडा एका हॉटेलमध्ये पार पडल्यानंतर आता लग्नसोहळा मात्र दुसऱ्या हॉटेलमध्ये पार पडणार आहे. लखनऊच्या रमाडा हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या या लग्न सोहळ्याला जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींना तर निमंत्रण असणारच आहे. पण याशिवाय इतर कोणती मान्यवर मंडळी लग्नाला हजेरी लावणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.