Soumitra Jarange: मुंबईकडं निघालेल्या मनोज जरांगेंची अवस्था पाहून पत्नी भावूक! सरकारवर कठोर शब्दांत व्यक्त केला संताप

Soumitra Jarange: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे अखेर मुंबईकडे रवाना झाले. अंतरवाली सराटी येथून दुपारी बारा वाजता लाखो मराठा बांधवासह कुटुंबियांनी त्यांना भक्कम पाठिंबा दर्शवत निरोप दिला.
Devendra Fadnavis_Manoj Jarange
Devendra Fadnavis_Manoj Jarange
Published on
Updated on

Soumitra Jarange: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे अखेर मुंबईकडे रवाना झाले. अंतरवाली सराटी येथून दुपारी बारा वाजता लाखो मराठा बांधवासह कुटुंबियांनी त्यांना भक्कम पाठिंबा दर्शवत निरोप दिला. तसंच मुंबईत माझ्या नवऱ्याला काही झाले तर माझ्यासहित संपूर्ण मराठा समाजाचा तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत संतापही त्यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशने निघाले तेव्हा त्यांचे अख्खे कुटुंब चिंताग्रस्त होते. पत्नी सौमित्रा, मुलगा, मुलींनी जरांगेंच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मनोज जरांगे पाटील हे पाच दिवसांनी मुंबईला पोहचणार आहेत. आज मुंबईला निघाले तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. मुलगा, पत्नी आणि मुलीने गळ्यात पडून त्यांच्याबद्दलची चिंता व्यक्त केली. पत्नी सौमित्रा जरांगे यांनी सरकारला दोष देत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर जरांगे पाटील यांच्यावर मुंबईला जाण्याची वेळच आली नसती. तिसऱ्यांदा त्यांना मुंबईत जावे लागत आहे, याचा सरकारने विचार करायला हवा. त्यांना काही झालं तर माझ्यासहित अख्ख्या मराठा समाजाचा तळतळाट सरकारला लागेल, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

Devendra Fadnavis_Manoj Jarange
Congress MLA: काँग्रेस आमदाराच्या पुतणीचा कारनामा! कामावर न जाताच दरमहा ७५,००० रुपये पगार घेत होती; 'असा' झाला भांडाफोड

मनोज जरांगे पाटील यांच्यावर मुंबईला जाण्याची वेळ सरकारने आणली आहे. वेळीच मागण्या मान्य केल्या असत्या तर ते मुंबईला गेले नसते. त्यांनी दोन वेळा गुलाल उधळला. त्यांचा सरकारनेच अपमान केला. मुंबईला जाण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. पत्नी म्हणून कोणाला वाटतं की, आपला नवरा अन्नावाचून राहावा. माझा नवरा राहत आहे. कारण हे सरकारचं अपयश आहे.

एक महिना झाला, त्यांच्याशी बोलणं झालं नाही. सरकारने मुंबईला येण्याआधी तोडगा काढला पाहिजे. उपोषणस्थळी गेल्यापासून ते तिकडेच आहे. मागील १८ दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या तब्येतीची चिंता वाटत आहे. कारण १८-१८ दिवस काय माणूस १८ तास देखील बिना अन्न पाण्याचं राहू शकत नाही. आज १८ दिवस झाले, त्यांच्या अन्नाचा कण पोटात नाही. हे सरकारला दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

Devendra Fadnavis_Manoj Jarange
Someshwar Election : ४२ गड्यांना घेऊन शिवतारेंची सोमेश्वरच्या मैदानात एन्ट्री; पवारांच्या लढतीला नवा ट्विस्ट

सगळ्या मागण्या मान्य करा..

मुलगी म्हणून मला वडीलांची काळजी वाटते. त्यांची मुंबईला जायची तिसरी वेळ आहे. १८ दिवसांचे उपोषण सुरू आहे. सरकारच्या अपयशामुळे मुंबईला जाण्याची वेळ आली आहे. विनंती करूनही सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्यांचा विचार करावा.

चौदापैकी इतक्या मागण्या मान्य केल्या हे आकडे सांगण्याऐवजी सरकारने सगळ्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी जरांगे पाटील यांच्या मुलीने माध्यमाशी बोलताना केली. खरंच मागण्या मान्य कराव्यात, कागदावर ठेवू नका. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करा. एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर समाजाचे असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com