Priyanka Gandhi On NEET Controversy  sarkarnama
देश

Priyanka Gandhi NEET Controversy : "एका कुटुंबाचा आक्रोश अन् दिल्लीत स्वागत सोहळा..." NEET वादावर प्रियांका गांधींचा भाजपला सवाल

Priyanka Gandhi questions BJP over NEET controversy and Dharmendra Pradhan’s resignation amid Maharashtra student suicide case : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेत झालेल्या स्वागतावर प्रियांका गांधींचा सवाल; अहिल्यानगरातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

Pradeep Pendhare

NEET student suicide Maharashtra : नीट (NEET) परीक्षेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रातील एका विद्यार्थिनींच्या मृत्यूचा उल्लेख करत त्यांनी माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसद परिसरात झालेल्या स्वागतावर प्रश्न उपस्थित केले.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, "अत्यंत लाजिरवाण्या परिस्थितीत राजीनामा द्यावा लागला. मात्र संसद परिसरात पोहोचताच भाजपच्या (BJP) खासदारांनी त्यांचे जणू एखादा सुपरस्टार आल्याप्रमाणे स्वागत केले."

त्यांनी पुढे दावा केला की, धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचे संसद परिसरातील प्रवेशद्वाराजवळ स्वागत सुरू असताना महाराष्ट्रातील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. नीट परीक्षेतील घडामोडींमुळे एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचा संदर्भ देत त्यांनी केंद्र सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

"त्या विद्यार्थिनीचे कुटुंब शोकाकुल असताना दिल्लीत वेगळेच चित्र पाहायला मिळत होते. केंद्र सरकारला नेमका कोणता गर्व आहे?" असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी नव्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीवरही टीका केली. "डोळ्यांत लाज असायला हवी होती, मात्र गळ्यात फुलांचे हार घालून स्वागत स्वीकारले गेले. त्यानंतर पंतप्रधानांनी नव्या शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती केली. त्या नियुक्तीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. देशातील कोट्यवधी मुलींना यातून कोणता संदेश दिला जात आहे?" असेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातील दोन विद्यार्थिनींचा मृत्यू

दरम्यान, महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने नीट फेरपरीक्षेतील निकालानंतर आत्महत्या केल्याची घटना घडली. तर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात आणखी एका विद्यार्थिनीने नीट परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने नैराश्यात विषारी औषध प्राशन केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT