Priyanka Gandhi : अमित शाह, नरेंद्र मोदींना विचारले का? प्रियंका गांधी प्रचंड संतापल्या, गाडीत बसून निघून गेल्या...

Priyanka Gandhi Amit Shah Dharmendra Pradhan : संसदेचे कामकाज आज स्थगित करण्यात आले. त्यावरून पत्रकरांनी प्रियंका गांधी यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी संताप व्यक्त करत ज्यांना प्रश्न विचारायला हवेत त्यांना विचारता का? असा प्रतिप्रश्न केला.
 Priyanka Gandhi
Priyanka Gandhisarkarnama
Published on
Updated on

Priyanka Gandhi News : नीट पेपर फुटी वादानंतर शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून प्रियंका गांधी आक्रमक झाल्या आहेत. आज सत्ताधारी खासदार आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात संसद परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.दरम्यान, पत्रकारांनी संसदचे अधिवेशन चालत नसल्याबद्दल प्रियंका गांधी यांना प्रश्न केला.

त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, येवढे मोठे आंदोलन सुरू आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत आले नाही. आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय की संसद का नाही चालत?

प्रियंका गांधी यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न करत म्हटले की, तुम्ही धमेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? याचा प्रश्न विचारला का? आंदोलन करणाऱ्या मुलांना का मारले गेले, ते दवाखान्यात आहेत? त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारला का?

नेट बंद केले आहे, आई-वडील आपल्या मुलांशी बोलू शकत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला जात आहे, ते आंतकवादी आहेत का? याबाबत तुम्ही प्रश्न विचारला का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी केला.

 Priyanka Gandhi
Parliament news : भाजपच्या खासदारांना प्रियांका गांधी भिडल्या; संसदेच्या आवारात सत्ताधारी-विरोधकांमध्ये घमासान

संसदेचे कामकाज स्थगित

सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाले होते.त्यामध्ये सभागृहात गोंधळ झाला दरम्यान, लोकसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. मंत्री किरण रिजुजी यांनी सांगितले की, आम्ही चर्चेसाठी तयार आहेत. संसदेत आम्ही चर्चा करू. मात्र,विरोधकांनी धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला.

 Priyanka Gandhi
CJP vs Anna Hazare Protest : दिल्लीतील सत्ताधीशांना हादरविणारे आंदोलन; अण्णा हजारेंच्या ऐतिहासिक जनआंदोलनाची पुनरावृत्ती की केवळ राजकीय स्टंट?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com