Congress News : लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. नंतर त्यांनी गांधी घराण्याची पारंपारिक जागा रायबरेली निवडली आणि वायनाड सोडली. त्या जागेवर काँग्रेसकडून पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारी (ता.18) सुरूवात झाली. आता तिथे काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्षाने ज्येष्ठ नेते सत्यन मोकेरी आणि भाजपकडून नाव्या हरिदास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्यासमोर तगडं आव्हान असणार आहे.
काँग्रेस (Congress) पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रॅलीनंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यावेळी त्यांच्यासोबत भाऊ राहुल गांधी,आई सोनिया गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.
प्रियांका गांधी यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी 17 वर्षांची असताना 1989 मध्ये पहिल्यांदा वडिलांसाठी प्रचार केला होता. तेव्हापासून या 35 वर्षांत आई आणि भावासाठी मतं मागितली. पण आता पहिल्यांदाच मी स्वतःसाठी मतदारांचा पाठिंबा मागत असल्याचंही त्यांनी सांगितले.
प्रियांका गांधी यांनी यावेळी केंद्रातील एनडीए सरकारवर टीकेची झोड उठवली.त्या म्हणाल्या,आज जे केंद्रात सत्तेत आहेत, त्यांनी सत्तेत राहण्यासाठी द्वेषाचा वापर केला.त्यांनी विभक्तता निर्माण केली. हे आपले राष्ट्र ज्या राजकारणावर बांधले गेले ते नाही. आपण आज राष्ट्रवादाच्या या मूल्यांसाठी लढत आहोत. आम्ही सत्य, न्याय आणि समतेसाठी लढत आहोत. या मूल्यांनी माझ्या भावाला भारतभर प्रेम आणि एकात्मतेसाठी चालण्याची प्रेरणा दिल्याचं कौतुकोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
त्यांनी यावेळी वायनाडमधील भूस्स्खलनाच्या दुर्घटनेवरही भाष्य केले.त्या म्हणाल्या, ज्यांचे संपूर्ण आयुष्य भूस्खलनात वाहून गेले.भूस्खलनादरम्यान मला एक गोष्ट लक्षात आली. इथे डॉक्टर, शिक्षक, गृहिणी, सगळे एकमेकांना मदत करण्यात व्यस्त होते. ीत्यां एकमेकांना सहानुभूती, प्रेम, आपुलकी आणि हिमतीसह कुठलाही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता आपत्तीग्रस्तांना साथ दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड हा देशाचा एक प्रदेश असून तिथे 2 खासदार आहेत. एक अधिकृत खासदार आणि दुसरा अनधिकृत खासदार आहे. दोघेही वायनाडसाठी काम करतील असा शब्दही राहुल गांधी यांनी यावेळी जनतेला दिला.
गांधी कुटुंबातील आणखी एक चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.प्रियांका गांधी यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची निवड केली आहे.या मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी तब्बल सव्वा चार लाख मतांनी विजय मिळवला होता. पण रायबरेलीतूनही त्यांनी विजय मिळवल्याने या मतदारसंघाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.