Sunil Tingre News : माझी उमेदवारी फिक्स, मला...; पहिल्या यादीत पत्ता कट, तरीही टिंगरेंचा कॉन्फिडन्स कायम

NCP Candidate List 2024 News : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांचा उमेदवारीतून पत्ता कट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या असताना त्यांनी आपली उमेदवारी फिक्स असून आपल्याला एबी फॉर्म देखील मिळाला असल्याचे स्पष्ट केले आहे.
Ajit Pawar- Sunil Tingre
Ajit Pawar- Sunil Tingresarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये अजित पवारांसह पुणे जिल्ह्यातील सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

पुणे शहरातील येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी हडपसर विधानसभा मतदार संघामधून चेतन तुपे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. मात्र, दुसरीकडे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांचा उमेदवारीतून पत्ता कट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या असताना त्यांनी आपली उमेदवारी फिक्स असून आपल्याला एबी फॉर्म देखील मिळाला असल्याचे स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही मित्र पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. या उमेदवारी यादीमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश नसल्याने हा मतदारसंघ भाजपला सुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांना सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी पूर्णविराम दिला आहे. माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरे म्हणाले, माझा अजितदादांवर पूर्ण विश्वास आहे. पक्षाने मला एबी फॉर्म दिलेला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक ही वडगाव शेरीच्या विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्नच येत नाही, असे ठरलं तर मैत्रीपूर्ण लढत अनेक मतदारसंघात लढावं लागेल. त्यामुळे असे काही होईल, असे मला वाटत नसल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar- Sunil Tingre
Ajit Pawar NCP: कन्येला 'AB' फॉर्म, तर वडील वेटिंगवर; भाजपच्या कठोरपणामुळे अजितदादांची कोंडी?

टिंगरे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आव्हान असणार आहे. याबाबत बोलताना म्हणाले, शरद पवारांच्या सहानुभूतीच्या जोरावर जर कोण निवडणूक लढत असेल तर ते कधीच यशस्वी होणार नाहीत. माझ्यासमोर येणाऱ्या उमेदवाराने विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवावी. कारण शरद पवार कालही आमच्यासाठी दैवत होते आणि आजही आहेत. ते माझे कान पकडू शकतात, माझ्या चार पिढ्याने त्यासाठी काम केलेले आहे.

विधानसभेच्या उमेदवारीबाबत माझं अजित पवार यांच्याशी बोलणं झालेले आहे. त्यासोबतच प्रफुल पटेल यांच्याशी बोलणे झाले आहे. सर्वांनी मला विधानसभा लढण्यासाठी सांगितलेली आहे. वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होईल, असा विश्वास टिंगरे यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar- Sunil Tingre
Mahayuti vs MVA : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु; महायुती, मविआत जोरदार रस्सीखेच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com