Congress News : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय होईल. आम्ही सिद्धांतांसाठी लढतोय. जनता भाजपमुळे त्रस्त आहे. भाजपचं सरकार जिथे आहे तिथे शेतकरी आणि तरुण चिंतेत आहेत. रोजगार मिळत नाही. शिक्षणाचे माध्यम नाही. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक निवडणुकीत महिलांचं योगदान मोठं आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
या विधानसभा निवडणुकांमध्ये तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्न प्रियांका गांधी यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. पक्षाच्या सिद्धांतांसाठी लढणं ही माझी या निवडणुकीत भूमिका आहे. गरीब, महिला आणि शेतकऱ्यांसाठी लढणं, ही भूमिका आहे, असं त्या म्हणाल्या.
राजस्थानमध्ये काँग्रेस निवडणूक जिंकल्यावर गेहलोत मुख्यमंत्रिपदी राहणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. याचं उत्तर हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देतील, असं प्रियांकांनी सांगितलं. राजस्थानमध्ये आमचा पक्ष एकजुटीने लढत आहे. आणि तिथे भाजप पूर्णपणे विखुरली गेली आहे, असं उत्तर सचिन पायलट यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रियांकांनी दिलं.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून निवडणूक लढणार का? असा प्रश्न प्रियांकांना विचारला गेला. तुम्हाला दिसेलच मी काय करेल ते, असं उत्तर प्रियांकांनी दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.