Rajasthan CM : काय प्रतिष्ठा राहिली? राहुल गांधींना 'मूर्खांचे सरदार' म्हणणाऱ्या PM मोदींवर गेहलोतांचा पलटवार

Rajasthan Election 2023 Ashok Gehlot on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर बोचरी टीका केली. यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे...
PM Modi, Ashok Gehlot
PM Modi, Ashok GehlotSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Election 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदींवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पलटवार केला आहे. 'मूर्खांचे सरदार' अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राहुल गांधींवर केली होती. यावरून अशोक गहलोत यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधानपदारील व्यक्तीने अशा भाषेचा उपयोग करणं दुर्दैवी आहे. किमान पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा तरी त्यांनी राखावी, असं अशोक गहलोत म्हणाले. अशोक गहलोत यांनी जयपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

PM Modi, Ashok Gehlot
PM Modi News : "कुठल्या जगात वावरतो हा मूर्खांचा सरदार..."; मोदींची राहुल गांधींवर शेलक्या भाषेत टीका

हे अतिशय दुर्दैवी आहे. देशात पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आहे. अशा प्रतिष्ठेच्यापदावरून राजकीय नेत्यांवर शेलक्या भाषेत टीका होत असेल आणि चिथावणीखोर वक्तव्य केली जात असतील तर त्याची जेवढी निंदा करावी तितकी कमीच आहे. कारण पंतप्रधानपदासारख्या प्रतिष्ठेच्या पदावरून अशा प्रकारे भाषा वापरली जात असेल तर त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार? धर्माच्या नाखाली तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहेत. यामुळे परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण रंगलं आहे.

'लाल डायरी'चे षडयंत्र रचले- गेहलोत

भाजपच्या नेत्यांनी राजस्थानमधील तत्कालीन मंत्र्याला हाताशी धरून 'लाल डायरी'चे षडयंत्र रचले. पण आम्हाला याची चिंता नाही. कारण आमचा उद्देश हा काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचा आहे, असं अशोक गेहलोत म्हणाले. अशोक गहलोत यांच्या मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आलेले राजेंद्र गुढा यांनी मोठे आरोप केले आहेत. 'लाल डायरी' मध्ये अशोक गहलोत आणि इथर नेत्यांच्या अवैध व्यवहारांच्या नोंदी आहेत, असा आरोप गुढा यांनी केला आहे. या डायरीतील काही पानांचे फोटो अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लाल डायरी आणि काळी डायरी, माहिती नाही हे काय आहे. पण हे सर्व षडयंत्र केंद्र सरकारमधील गृहमंत्रालयात रचलेले आहे. तिथे डायरीला 'लाल डायरी' असं नाव दिलं गेलं. पंतप्रधान मोदींच्या सिकर दौऱ्याच्या चार दिवस आधी त्या व्यक्तिचा दुरुपयोग केला गेला जो आमचा मंत्री ( राजेंद्र गुढा ) होता. त्यांच्याशी बोलून भाजप नेत्यांनी हे सर्व षडयंत्र रचलं, असा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.

PM Modi, Ashok Gehlot
Rahul Gandhi : मध्य प्रदेशात काँग्रेस किती जागा जिंकणार ? राहुल गांधींनी केला मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com