Priyanka Gandhi Vadra  sarkarnama
देश

Priyanka Gandhi News : ठरलं तर...! 'वायनाड'मधून हा पक्ष देणार प्रियांका गांधीना टक्कर!

Sudesh Mitkar

Mumbai News : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी वाड्रा यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) ने उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. सीपीआयचे राज्य सचिव बिनॉय विश्वम यांनी याबाबत माहिती दिली आहे. डाव्या लोकशाही आघाडीचा (एलडीएफ) भाग असलेल्या सीपीआयकडे वायनाड लोकसभेची जागा आहे आणि त्यांचा पक्षाचा उमेदवार पोटनिवडणूक लढवणार आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) आणि डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) हि जागा लढणार यात काहीच शंका नाही. याठिकाणी भारतीय जनता पक्षाला (भाजप) अनुकूल असे वातावरण नाही. त्यामुळे आम्ही तिथे आमचा उमेदवार नक्कीच उभा करू." प्रियंका गांधी वड्रा यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता बिनॉय विश्वम म्हणाले की, काँग्रेसने कोणत्या जागी कोणाला उमेदीवरी द्याचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

जर काँग्रेस पक्षाला वायनाडची जागा सोडण्याचीच होती तर त्यांना राहुल गांधीं सारख्या प्रमुख नेत्याला दक्षिणेत आणण्याची गरज नव्हती. आणि जर ते इथून मोठ्या मतांनी जिकूंन आले असतील तर त्यांनी हि जागा सोडणे अत्यंत चुकीचं असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाडमधून राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, राहुल गांधींनी ही जागा 364422 मतांनी जिंकली. त्यांना एकूण 647445 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ॲनी राजा यांना केवळ 283023 मते मिळाली आणि त्यांना 364422 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. वायनाडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 141045 मते मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा ॲनी राजा हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे बोले जात आहे.

नवी दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाच्या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांनी सोमवारी राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा जागा राखतील आणि वायनाडची जागा सोडतील असं जाहीर केले होते तर राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा वयनाथमधून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. 4 जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 14 दिवसांच्या आत त्यांना एक जागा सोडावी लागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT