Odisha Train Accident news Sarkarnama
देश

Odisha Train Tragedy : ओडिशा रेल्वे अपघाताबाबत नवी अपडेट : जबाबदार कोण ? ; सुप्रीम कोर्टात..

Odisha Train Tragedy : अधिवक्ता विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Odisha Train Tragedy news : ओडिशा रेल्वे अपघाताबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. या अपघाताला जबाबदार कोण, असे प्रश्न विचारण्यात येत आहे. याप्रकरणी रविवारी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका Public Interest Litigation) दाखल करण्यात आली आहे.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तिहेरी रेल्वे अपघाताच्या चौकशीची मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये कवच संरक्षण प्रणाली म्हणून ओळखल्या जाणार्‍या ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) प्रणालीच्या त्वरित अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देश जारी करण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि तांत्रिक सदस्यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ आयोगाची तात्काळ स्थापना करण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे. या आयोगाचा उद्देश रेल्वे व्यवस्थेतील विद्यमान जोखीम आणि सुरक्षा मापदंडांचे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे हा असेल. याशिवाय, एकूणच रेल्वे सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी ते पद्धतशीर सुरक्षा सुधारणा सुचवेल. जनहित याचिकेत आयोगाला दोन महिन्यांच्या कालावधीत अहवाल सादर करण्याची विनंती तिवारी यांनी केली आहे.

शुक्रवारी बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्टेशनवर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एका मालगाडीची टक्कर झाली. या अपघातामुळे दोन्ही पॅसेंजर गाड्यांचे 17 डबे रुळावरून घसरले आणि मोठे नुकसान झाले. मृतांची संख्या शनिवारी 288 झाली, तर जखमींचा आकडा ९००वर जाऊन पोहचला आहे.

आतापर्यंतच्या भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जात असून ओडिशातील या मृत्यूतांडवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षांमधील नेत्यांपासून ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या अपघातावर रेल्वे बोर्डाकडून रविवारी सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये केवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाल्याचं जया सिन्हा यांनी सांगितलं . कोरोमंडल एक्सप्रेस लोखंडाने भरलेल्या मालगाडीवर आदळली. हा अपघात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचंही त्या म्हणाल्या.

रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी बहानागा स्टेशनवर येत होती. तिचा अपघात झाला, त्यामुळे स्टेशनवर उभा असलेली मालगाडी आणि तिथून जाणाऱ्या गाडीलाही नुकसान झालं. ज्या गाड्या स्टेशनवर थांबत नाहीत मधोमध असणाऱ्या मेन लाईनवरून जातात. तर एखाद्या गाडीला थांबवायचं असेल तर लूप लाईन असते. दोन मेल गाड्या जाणार होत्या. चेन्नईकडून यशवंतपूर एक्सप्रेस येत होती. तर शालिमारहून कोरोमंडल येत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT