Sanjay Raut Apologizes Ajit Pawar : राऊत नरमले ; " अजितदादांबाबत मी असे बोलायला नको होते ; धरणामध्ये xxxपेक्षा ..

Sanjay raut on Ajit Pawar : राऊतांनी रविवारी खुलासा देत या वादावर पडदा टाकला
Sanjay Raut , Ajit Pawar
Sanjay Raut , Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay raut on Ajit Pawar : "पत्रकारांनी मला अजितदादांबाबत अर्धवट आणि वेगळा प्रश्न विचारला होता. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिले, याचा मला खेद वाटतो, मी असे बोलायला नको होते," असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची माफी मागितली आहे.

"पवार कुटुंबियांशी माझे स्नेहाचे संबंध आहेत, अजितदादा हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचा आणि माझा स्वभाव सारखा आहे. आम्ही फार पटकन रिएक्ट होतो,असे राऊत म्हणाले.

"धरणामध्ये xxxपेक्षा थुंकणं चांगलं ," अशा शब्दात राऊतांनी अजित पवारांना शनिवारी फटकारले होते. आघाडीतील या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्ह यानिमित्ताने निर्माण झाली होती. त्यावर राऊतांनी रविवारी खुलासा देत या वादावर पडदा टाकला आहे. "आम्ही सगळे सहकारी आहोत," असे राऊतांनी स्पष्ट केले आहे.

आज (रविवारी) नागपूर दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता, ते म्हणाले की संजय राऊत मोठे नेते आहेत. ते राज्यसभेचे मेंबर आहेत. जर का माझच त्याबद्दल काही म्हणणे नसेल तर तुम्हाला का वाईट वाटत आहे आणि जर माझ्या कार्यकर्त्यांना वाईट वाटत असेल तर मी त्यांना समजावून सांगतो असे म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.

Sanjay Raut , Ajit Pawar
Ajit Pawar ON BMC election : मुंबईत ठाकरेंसोबतच आघाडी करणार का ? ; अजित पवार म्हणाले, "ठाकरेंबाबत सहानुभूती.."

संजय राऊत यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच थुंकण्याची ॲक्शन केली. त्यांनंतर राज्यातील अनेक राजकारण्यांनी याबाबद्दल संताप व्यक्त केला. तर पक्षाच्या नेत्यांनी तार्तम्य बाळगावे आणि आपले मत व्यक्त करावे, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. अजित पवारांच्या या मताला प्रतित्युत्तर देत संजय राऊत म्हणाले की, धरणामध्ये xxxपेक्षा थुंकणं चांगलं अशी खालच्या पातळीवर टीका केली.

राऊतांच्या निषेधार्थ शिवसेनेकडून राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही राऊतांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी एका वाक्यताच राऊतांचा हा विषय मिटवला.

Sanjay Raut , Ajit Pawar
BJP-TDP Alliance Raises : भाजपला मिळणार तगडा साथीदार ; कर्नाटकातील पराभवानंतर दक्षिणेचं व्दार खुलं..

पुण्यात शुक्रवारी (ता. ३) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी देशासह राज्यातील घटनांवर भाष्य केले. दरम्यान, संजय राऊतांच्या कृतीबाबत प्रश्न विचारण्यात आला.

राऊतांनी केलेल्या कृतीमुळे राज्यातील वातावरणाबाबत पवार यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी त्यावर एका वाक्यातच विषय संपवून अधिक बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. "संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेली कृती हा काही राज्याचा किंवा राष्ट्राचा प्रश्न नाही. मी त्याबाबत भाष्यसुद्धा करू इच्छित नाही." यानंतर पवार यांनी या विषयावर जास्त बोलणे टाळले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com