Anti-drug activist Parvinder Singh Jota was cremated 26 days after being shot dead in Mansa, Punjab.  Sarkarnama
देश

Parvinder Singh Jota case : हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्याच्या पार्थिवावर 26 दिवसांनी अंत्यसंस्कार; शहांनी घेतली होती कुटुंबाची भेट, राहुल गांधींना केला होता विरोध

Punjab activist murder, Parvinder Singh murder case, Punjab news : परविंदर सिंह झोटा यांचे वडील भीम सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटीसाठी न येण्याच्या आवाहन केले होते.

Rajanand More

व्यसनविरोधी चळवळीतील पंजाबमधील सामाजिक कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. झोटा यांची १३ ऑक्टोबर रोजी मानसा येथील एका मेडिकल दुकानामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार देत थेट मुख्यमंत्र्‍यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

पंजाबमधील पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. राज्यातील व्यसनाधिनता हा मुद्दा निवडणुकीत गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचपार्श्वभूमीवर झोटा यांची हत्या झाल्याने या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. हत्येनंतर झोटा यांच्या कुटुंबीयांनी पोस्टमार्टेम करण्यास तसेच पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला होता. झोटा यांचे पार्थिव मानसा येथील शासकीय रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले होते.

सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर रविवारी कुटुंबीयांनी झोटा यांचे पार्थिव ताब्यात घेत त्यांच्याच शेतात अंत्यसंस्कार केले. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी मानसा येथील त्यांच्या घरी जात कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले होते.

राहुल गांधींना विरोध

परविंदर सिंह झोटा यांचे वडील भीम सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटीसाठी न येण्याच्या आवाहन केले होते. कुटुंबाची किंवा मानसा येथे सुरू असलेल्या आंदोलकाची भेट न घेण्याचे आवाहन राहुल गांधींना करण्यात आले होते.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील शीख दंगलीमुळे शीख समाजामध्ये नाराजी आहे. राहुल गांधी हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी किंवा घरी भेटायला येऊ नये, असे भीम सिंह यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT