Devendra Fadnavis news : महिला सरपंचांचे धाडस, थेट CM फडणवीसांनाच मागितली पोच पावती; राज्यात पहिल्यांदाच असं घडलं...

Woman sarpanch, Lata Bagde, Nagpur news : सरपंच बागडे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रथमच भेटत असल्याचे सांगताना गावातील विविध प्रश्न संदर्भात निवेदन दिले.
Woman sarpanch Lata Bagde submitted a memorandum highlighting village issues to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and sought an official acknowledgement receipt.
Woman sarpanch Lata Bagde submitted a memorandum highlighting village issues to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and sought an official acknowledgement receipt.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra news : आमदार, खासदार, मंत्री किंवा सरकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन दिले की त्याची पोच पावती घेतली जाते. एका महिला सरपंचांनी असेच एक निवेदन थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हातात दिले. मुख्यमंत्र्‍यांनी ते निवेदन वाचले. सरपंचांनी त्यांच्यासमोर गावातील प्रश्नही मांडले. शेवटी या सरपंचांनी निवेदन दिल्याची पोच पावती मागितली. मुख्यमंत्र्‍यांनी लगेच पोच देण्याची सूचना केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध गावांमधील समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी नरखेड तालुक्यातील भिष्णूर गावच्या सरपंच लताताई बागडे यांनीही मुख्यमंत्र्‍यांसमोर गावातील प्रश्न मांडले.

सरपंच बागडे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रथमच भेटत असल्याचे सांगताना गावातील विविध प्रश्न संदर्भात निवेदन दिले. निवेदन देताना त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांनाच मला निवेदनाच्या स्थळ प्रतिवर पोच द्यावी, अशी मागणी केली.

Woman sarpanch Lata Bagde submitted a memorandum highlighting village issues to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and sought an official acknowledgement receipt.
Rajendra Pawar emotional post : लहानपणी टोचलेल्या काट्यांच्या आठवणींची कुरूपं आता बोचून एकटेपणा देत राहणार..! राजेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांना पोच पावती मागावी ही घटना प्रथमच घडत होती, परंतु त्या मागची भूमिका समजावून घेताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना पोच देण्याची सूचना यावेळी केली, अशी माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे.

Woman sarpanch Lata Bagde submitted a memorandum highlighting village issues to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and sought an official acknowledgement receipt.
PM Modi news : मुख्यमंत्री फडणवीस यांची 'ही' कृती मनाला स्पर्श करणारी! PM मोदींना दिवाळीत कोणती गोष्ट भावली?

सरपंच लताताई बागडे यांनी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गावात सुरू असलेल्या कामांचा दर्जा, अटल भूजलची कामे, विविध कामांसाठी निधी अशी विविध मागण्या केल्या. मुख्यमंत्र्‍यांनी त्यांना या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी जागृतपणे काम करत आहेत गावात पिण्याचे पाणी गुरांच्या चारा व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देत असल्याबद्दल मुख्यमंत्र्‍यांनी समाधानही व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.