Government Offices News  Sarkarnama
देश

Government Offices News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ; कार्यालयांच्या वेळा बदलल्या ; आता सकाळी..

Government Offices in punjab New : वीजेच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे हा निर्णय घेतला .

सरकारनामा ब्युरो

Government Offices in punjab will now open 7:30 am to 2 pm : 'सरकारी काम आणि सहा महिने थांब,' हे टाळण्यासाठी, सरकारी कामांना गती देण्यासाठी आणि उन्हाळ्यात वीजेची बजत करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सरकारी कामाची वेळ ही सकाळी साडेसात ते दुपारी दोन असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

या निर्णयामुळे राज्यात ३०० ते ३५० मेगावॅट वीजेची बजत होणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. सरकारी कामाच्या वेळात येत्या २ मे ते १५ जुलैपर्यंत हा बदल पंजाबमध्ये करण्यात आला आहे. उन्हाळ्यात वीजेच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माध्यमांना सांगितले.

सामान्य व्यक्तींना सकाळी आपले सरकारी काम करता यावे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कामानंतर सामाजिक काम करता यावे, याबाबत सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करुन हा हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले.

या बदललेल्या वेळेमुळे नागरिकांना सरकारी कामासाठी सुटी घ्यावी लागणार नाही, सकाळी काम झाल्यामुळे ते आपल्या कामाच्या ठिकाणी नियोजित वेळेत जाऊ शकतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.

या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सांयकाळी आपल्या कुंटुबियांसोबत आनंदाने घालविता येईल. मुलांच्या शाळा दुपारनंतर सुटल्यामुळे त्यांच्यासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना वेळ घालविता येईल, असे मान यांनी सांगितले.

याबाबत पंजाब सरकारने आदेश काढला आहे . राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना या नियम लागू आहे.यामुळे वीजेचे मोठ्या प्रमाणात बचत होईल, असे मान यांनी सांगितले. दुपारी एक वाजेनंतर वीजेची मागणी अधिक वाढत असते त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

कार्यालयाची वेळ सकाळी असल्यामुळे नैसगिक प्रकाशाचा उपयोग अधिक प्रमाणात करता येईल, असे मान सरकारचं म्हणणं आहे. येत्या काही दिवसात नागरिकांच्या हिताने अनेक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT