Eknath Shinde Ayodhya Tour : शिंदेंनी जे केलं ते योग्यचं..मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे धर्माच्या विरोधात गेले ; अयोध्येत पुजारी..

CM Eknath Shinde Ayodhya Visit : ठाकरेंनी स्वार्थासाठी महाविकास आघाडी केली.
Eknath Shinde Ayodhya Tour
Eknath Shinde Ayodhya TourSarkarnama
Published on
Updated on

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (रविवारी) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, आज (ता.८) संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहेत. यासाठी अयोध्येत शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

अयोध्येतील प्रभु श्रीराम मंदिरातील पुजारी सत्येंद्र दास यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात काही महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडून महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. यावर सत्येंद्र दास यांनी भाष्य केलं आहे.

Eknath Shinde Ayodhya Tour
Ajit Pawar News : 'त्या' वृत्ताचा अजित पवार यांनी घेतला समाचार; म्हणाले..

सत्येंद्र दास म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी जे केलं ते योग्यचं केले, मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे धर्माच्या विरोधात गेले, ठाकरेंनी स्वार्थासाठी महाविकास आघाडी केली,"

उद्धव ठाकरे यांना विरोध करणारे महंत परमाहंस आचार्य मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यामुळे हिंदूत्त्वाच्या विचारापासून दूर गेले असे म्हणत महंत परमाहंस यांनी उद्धव ठाकरेंचा विरोध केला होता.

Eknath Shinde Ayodhya Tour
Sharad Pawar News : जेपीसी पेक्षा कोर्टाची कमिटीच अधिक विश्वसनीय ; शरद पवारांचा पुनरुच्चार ; 'हिंडनबर्ग' मला..

आता तेच महंत शिंदेचं स्वागत करणार आहे. यासाठी जय्यत तायरी सुरू करण्यात आली आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत जगतगुरु परमाहंस आचार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करणार आहेत. यापूर्वी महंत परमाहंस आचार्य यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध केला होता.

Eknath Shinde Ayodhya Tour
CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये रेल्वेत राडा

"बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे पुढे नेहत आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असून त्यांनी या पुढे आयोध्येला नाही तर मक्काला जावे. जे प्रभू श्री रामाचे होऊ शकले नाहीत, ते हिंदुत्वाचे विचार काय पुढे नेणार" अशी टिकाही परमहंस आचार्य यांनी केली आहे.

रविवारपासून मुख्यमंत्री दोन दिवसाच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com