Amritpal Singh news : Sarkarnama
देश

Amritpal Singh News : मुख्यमंत्री मान म्हणाले, " १८ मार्च रोजीच त्याला पकडले असते, ; पोलिसांनी गोळीबार..

Punjab cm Bhagwant Mann ON Amritpal Singh : दर १५ मिनिटांनी मी अपडेट घेत होतो.

सरकारनामा ब्यूरो

Punjab cm Bhagwant Mann ON Amritpal Singh : पंजाब पोलिसांनी आज (रविवारी) खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला मोगा येथून अटक केली आहे. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली.

भटिंडा विमानतळावरून अमृतपालला विमानाने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात नेण्यात आले आहे. अमृतपालवर NSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अमृतपालच्या अटकेनंतर पत्रकार परिषद घेत या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. मान म्हणाले, "अमृतपालच्या अटकेची मोहीम पंजाब पोलिसांनी यशस्वी केली, त्यांचे मी अभिनंदन करतो. ते कौतुकास पात्र आहेत.पंजाबच्या जनतेने शांतता राखावी,"

अमृतपाल याचे नाव न घेता मुख्यमंत्री मान यांनी त्याच्या अटकेच्या कारवाईबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "मी काल (शनिवारी) रातभर झोपलो नाही. अमृतपाल अटक आँपरेशनचे दर १५ मिनिटांनी मी अपडेट घेत होतो. कारण कायदा व्यवस्था बिघडू नये, असे मला वाटत होते. पंजाबच्या जनतेसाठी मला झोप लागली नाही, याचे मला वाईट वाटत नाही, "

अमृतपालच्या अटकेकडे पंजाब सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मान म्हणाले, "१८ मार्च रोजीच अमृतपाल याला अटक करता आली असती पण त्यावेळी गोळीबार करावा लागला असता. तेव्हा पंजाब पोलिसांनी संयम बाळगला," "देशाच्या सुरक्षितेला धोका ठरणाऱ्या व्यक्तींना माफ केले जाणार नाही, जनतेच्या सुरक्षितेसाठी आम्ही काम करीत आहोत, त्यांची सुरक्षा करणे आमचं कर्तव्य आहे," असे मान यांनी सांगितले.

आम आदमी पार्टी (AAP)चे नेता, राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले, "पंजाबमधील आपचे सरकार कुठल्याही परिस्थितीत पंजाबमधील शांतता भंग होऊ देणार नाही. जनतेची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्वाची आहे. आम्ही दाखवून दिले आहे की गरज पडल्यावर आम्ही कठोर कारवाई करु शकतो. आता जनतेनं शांतता राखावी,"

दिल्लीच्या शिक्षणमंत्री, आपच्या नेत्या आतिशी म्हणाल्या , "अमृतपालची अटक ही पंजाब पोलीस, मान सरकार यांची महिन्याभरच्या प्रयत्नाचे यश आहे. मी पंजाब पोलीस आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांचे अभिनंदन करते. वर्षभरापासून पंजाब पोलीस अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT