Harbhajan Singh  sarkarnama
देश

सिद्धू 'आऊट' झाल्यावर 'या' क्रिकेटपटूची राजकारणात एट्री,'आप'चा खासदार होणार

आम आदमी पक्षाने अजून एक मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते पंजाबचे (Punjab)25 वे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे इतर नेते देखील उपस्थित होते. आम आदमी पक्षाने अजून एक मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. (Harbhajan Singh to become Aap MP)

पंजाबमधील कॉग्रेसच्या दारुण पराभवानंतर कॉग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्ध यांचा राजीनामा घेतला आहे.

दर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने अजून एक मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. नवज्योत सिंह सिद्धु राजकारणातून आऊट झाल्यानंतर आता आम आदमी पक्ष एका दिग्गज माजी क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहे.

आम आदमी पक्षाने हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवण्यासाठी तयारी केली आहे. हरभजन सिंगच्या )Harbhajan Singh)राजकीय प्रवेशासाठी 'आप' पायघड्या पसरत आहे.आपने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला धूळ चारली आहे. पंजाब आणि दिल्ली अशा दोन राज्यांत आपची सत्ता स्थापन झाल्यानंतर आपला आता आपला राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत.

नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. .नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ९० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

हरभजनला राज्यसभेवर पाठवण्यासाठी आप तयारी करीत असताना त्याच्याकडे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे नेतृत्वही देण्याची शक्यता नाकारता येत नाही. भगवंत मान (49) हे पंजाबचे दुसरे सर्वात युवा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्याआधी प्रकाश बादल हे 43 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT