Navjot Kaur Sidhu Launches BRP: काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे त्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय राष्ट्रवादी पार्टी (BRP) असे त्यांच्या पक्षाचे नाव असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
नवजोत कौर सिद्धू या माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी आहेत. सोमवारी रात्री उशीरा त्यांनी पक्षाची स्थापना केली.त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत, पण यात नवज्योत सिंह सिद्धू दिसत नसल्याचे ते गैरहजर का होते? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
"राजकीय नेत्यांच्या विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांनी केलेले काम अचूक आहे की नाही, याची तटस्थपणे चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर एक पर्याय म्हणून आम्ही पक्ष स्थापन करुन काम सुरु केले आहे. सामान्य जनतेचे जे हक्क, अधिकार आहेत, ते त्यांना मिळावेत, यासाठी आम्ही कटीबद्ध असू," असे नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे.
भाजपला ठक्कर देण्यासाठी लवकरच भारतीय राष्ट्रवादी पार्टी (BRP) पक्ष विस्ताराची घोषणा करणार असल्याचे संकेत नवज्योत कौर यांनी दिले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी वेळ असला तरी बीआरपीच्या एन्ट्रीनं राज्यात आणखी एका पक्षाची भर पडली आहे. राज्यात सध्या आम आदमी पार्टीचे सरकार आहे. काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे. तर भाजप गेले अनेक वर्ष पंजाब आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण त्यांना अद्याप त्यांना यश आलेले नाही.
'गोल्डन स्टेट'अशी ओळख पंजाबची होती. ती ओळख सत्ताधाऱ्यांनी पुसून टाकली आहे. पंजाबला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही समविचारी माणसं एकत्र येऊन या पक्षाची स्थापना केली आहे, असे नवज्योत कौर म्हणाल्या.
पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी 500 कोटी रुपयांची गरज असते' तिकीटासाठी कोट्यवधींची डील केली जाते, असे वादग्रस्त विधान गेल्या वर्षी त्यांना केले होते, या विधानानंतर काँग्रेसने त्यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका करायला सुरूवात केली होती. त्यानंतर काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. कौर यांनी कांग्रेस सोडल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजा अमरिंदर सिंह वडिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.