News Delhi News : दिल्लीत पराभव झाल्यानंतर पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार अस्थिर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना तातडीने आमदारांची बैठक घ्यावी लागली. भाजपकडून मिशन पंजाब सुरू झाल्याची भीती ‘आप’ला होती. त्यानंतर केजरीवालांनीही आता पंजाबमधील राजकारणावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.
पंजाबमधील प्रसिध्द अभिनेत्री सोनिया मान यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. दिल्लीतील पराभवानंतर आपमधील हा पहिला मोठा पक्षप्रवेश मानला जात आहे. सोनिया मान या पंजाबमध्ये युवकवर्गात खूप प्रसिध्द आहेत. त्यांच्या मोठा चाहता वर्ग असून आगामी काळात त्यांच्या माध्यमातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची आपची स्ट्रॅटेजी दिसते, अशी चर्चा आहे.
सोनिया यांनी आज केजरीवालांच्या उपस्थित आपमध्ये प्रवेश केला. त्यांनी यापूर्वी निवडणुकीत आपचा उघडपणे प्रचार केला होता. पण त्यावेळी त्या आपच्या अधिकृत सदस्य नव्हत्या. मात्र, आपच्या उमेदवारांसाठीचा प्रचार आणि शेतकरी आंदोलनातील त्यांच्या सक्रीय सहभागामुळे त्या लवकरच राजकारणात प्रवेश करणार, याबाबत चर्चा सुरू होती.
पंजाबमधील शेतकरी नेते बलदेव सिंह यांच्या सोनिया या कन्या आहेत. त्यामुळे सामाजिक शेतकरी संघटनेसह इतर सामाजिक कामांमध्येही त्या काही प्रमाणात सक्रीय होत्या. शेतकरी आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. ऑल इंडिया जाट महासभेशी त्यांचा संबंध होता. त्यांना महिला युवा मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
नुकताच त्यांनी युवा मोर्चा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पंजाब सीमेवर शेतकऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराचे कारण त्यासाठी सांगितले जात होते. त्यानंतर त्यांच्या आप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सोनिया या पंजाब चित्रपटसृष्टीत प्रसिध्द असल्या तरी त्यांनी तेलुगु, हिंदी आणि मल्ल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मल्याळम चित्रपट ‘टीन्स’ मधून सोनिया यांनी 2013 मध्ये आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर त्याचवर्षी पहिला पंजाबी चित्रपट ‘हाणी’ रिलीज झाला होता. आता त्यांनी राजकारणात एन्ट्री घेत नवा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे आपची ताकद निश्चितच वाढणार आहे. दरम्यान, पंजाबमध्ये 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक आहे. तोपर्यंत सोनिया यांच्या माध्यमातून युवकवर्गाला, महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी आपकडून प्रयत्न केले जाऊ शकतात. यामाध्यमातून भाजपचे मिशन पंजाब फेल करण्याची रणनीती आखण्यास आपने आतापासूनच सुरूवात केल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.