Delhi CM Rekha Gupta : रेखा गुप्तांनी केजरीवालांचा ‘तो’ निर्णय बदलल्यास भाजपच अडचणीत येणार

Chief Minister office Dr Babasaheb Ambedkar Bhagat Singh : रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. यमुना स्वच्छतेपासून कॅग अहवालापर्यंत त्यांनी निर्णय घेतले आहेत.
CM Rekha Gupta, PM Narendra Modi
CM Rekha Gupta, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी कॅबिनेटच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या आयुष्यमान भारत योजनेला त्यांनी हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर लगेचच त्यांनी कॅग अहवाल विधानसभेत सादर करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे आम आदमी पक्षाते धाबे दणाणल्याची चर्चा आहे.

कॅग अहवालात आपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळेच आपकडून हा अहवाल विधानसभेत सादर केला जात नसल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात होता. आपकडून हे आरोप फेटाळले जात होते. पण आता भाजपची सत्ता येताच हा अहवाल विधानसभेत सादर केला जाणार आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांसह आपचे काही नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

CM Rekha Gupta, PM Narendra Modi
Actress Sonia Mann : 'ही' सुंदर अभिनेत्री केजरीवालांना मिळवून देणार पंजाबची सत्ता?

एकीकडे रेखा गुप्ता यांनी निर्णयांचा धडाका लावला असला तरी केजरीवालांचा एक निर्णय बदलणे त्यांना आणि भाजपलाही अडचणीचे ठरू शकते. केजरीवालांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर आपल्या म्हणजे सीएम कार्यालयात खुर्चीच्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावले होते. आतिशी यांच्या काळातही हेच फोटो मुख्यमंत्री कार्यालयात होते.

केजरीवाल मुख्यमंत्री बनण्याआधी खुर्चीच्या मागे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो होते. देशातील इतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो दिसतात. त्यामुळे आता रेखा गुप्ता काय करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. केजरीवालांनी लावले फोटो त्या तसेच ठेवणार की वेगळा निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CM Rekha Gupta, PM Narendra Modi
Shivsena : "हे सगळे गए गुजरे लोकं" निलम गोऱ्हेंच्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर

रेखा गुप्ता यांनी फोटो हटवण्याचा निर्णय घेतल्यास भाजपसाठी ते अडचणीचे ठरू शकते. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून भाजपविरोधात सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. तर भगतसिंग हे युवकांचे आदर्श आहेत. त्यामुळे दोघांचेही फोटो काढणे, भाजपसाठी जोखीम ठरू शकते. त्यामुळे रेखा गुप्ता हा निर्णय तडकाफडकी घेणार नाही, अशीच शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com