Pushpa Munjiyal give her property to Rahul Gandhi Sarkarnama
देश

पाच राज्यांत पराभव अन् महिलेने राहुल गांधींच्या नावावर केली सर्व संपत्ती

देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

डेहराडून : देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. पण अजूनही अनेक नेत्यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले जाते. एकीकडे एक-एक नेता साथ सोडत असताना राहुल गांधी यांना सुखद धक्का बसला आहे.

उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. पण तेथील एका ७८ वर्षीय महिलेने आपली सर्व संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. त्यामुळे ५० लाख रुपयांची संपत्ती आणि त्यासोबतच १० तोळे सोनेही आहे. पुष्पा मुन्जियाल असं या महिलेचं नाव आहे. ही महिला डेहराडूनची रहिवासी असून त्यांनी राहुल गांधी यांची देशाला गरज असल्याचे म्हटलं आहे.

मुन्जियाल यांनी सर्व संपत्ती नावावर करताना कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केली आहे. त्यांनी संपत्तीचा मालकी हक्का राहुल यांच्या नावावर करणारे प्रतिज्ञापत्र डेहराडून न्यायालयात सादर केले आहे. आपण राहुल गांधींच्या विचारांनी खूप प्रभावित झालो आहोत. त्यांची देशाला गरज असल्याने ही संपत्ती त्यांच्या नावावर करत असल्याचे महिलेने सांगितले.

काँग्रेसचे (Congress) महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या संपत्तीची कागदपत्रे पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांना त्यांच्या घरी जाऊन दिली. राहुल गांधी यांच्या परिवाराने देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत बलिदान दिलं आहे. इंदिरा गांधी असो किंवा राजीव गांधी यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी आपले प्राण दिले, असं महिलेने सांगितल्याचे शर्मा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT