Putin, Xi Jinping Cars 
देश

Putin Jinping Cars: विमानानं भारतात आलेल्या पुतीन, जिनपिंग यांच्या चालत्या-फिरत्या किल्ल्याची सर्वत्र चर्चा; काय आहे कार्सची खासियत?

Putin Jinping Cars: भारतात यंदा ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेसाठी भारत, चीन, रशियासह ११ देशांच्या प्रमुखांनी हजेरी लावली.

सरकारनामा ब्युरो

Putin Jinping Cars: यंदाचं ब्रिक्स परिषदेचं आयोजन भारताकडं असून राजधानी नवी दिल्लीत या परिषदेचं देखणं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत अनेक द्विपक्षीय बैठका झाल्या, तसंच गंभीर विषयांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं चर्चा पार पडली. यासंबंधीचं संयुक्त घोषणापत्रही शनिवारी जाहीर करण्यात आलं. पण या पलिकडे एका खास गोष्टीची चर्चा मात्र सगळीकडं सुरु होती. ही खास गोष्ट म्हणजे पुतीन आणि जिनपिंग यांच्या खास सुरक्षित कार्स. विशेष विमानानं या कार भारतात आल्या आहेत. काय आहे या कार्सची खासियत जाणून घेऊयात.

Xi Jinping Car Hongqi N701

ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीमध्ये आलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ‘होंगछी एन ७०१’ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ‘ऑरस सेनेट’ या कार्सनी आज सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. परदेश दौऱ्यांच्या वेळी राष्ट्रप्रमुखांच्या विशेष गाड्या अनेकदा विमानाने वेगळ्या पाठविल्या जातात आणि नेत्यांच्या आधीच त्या संबंधित देशामध्ये पोहोचतात. या पद्धतीनुसार जिनपिंग आणि पुतिन यांच्या कार्सही त्यांच्या आगमनापूर्वी भारतात दाखल झाल्या होत्या.

कपड्याखाली झाकून ठेवल्या कार्स

जिनपिंग यांच्यासाठी वापरली जाणारी ‘होंगछी एन-७०१’ ही अत्यंत सुरक्षित, बुलेटप्रूफ आलिशान लिमोझीन मोटार कपड्याखाली झाकून ठेवण्यात आली होती. साधारणपणे मालवाहू विमानातून उतरविलेल्या मोटारी मोठ्या ट्रकवर ठेवताना त्यावर जाड कापड किंवा ताडपत्री टाकली जाते. यामुळे गाड्यांचे धूळ, पाऊस, ऊन आणि अचानक होणाऱ्या अपघातांपासून रक्षण तर होतेच, शिवाय प्रत्यक्ष वापराच्या वेळेपर्यंत त्या चकचकीत राहतात. जिनपिंग यांची ‘होंगछी एन ७०१’ ही लिमोझिन मोटार ‘होंगछी’ या ब्रँडने तयार केली आहे. खास सर्वोच्च नेतृत्वासाठीच तिची निर्मिती करण्यात आली आहे. या मोटारीचे तांत्रिक तपशील अत्यंत गुप्त ठेवले जातात. ही बुलेट-प्रूफ मोटार बॉम्बस्फोट आणि रासायनिक हल्ल्यांपासूनही बचाव करू शकते, अशी तिची ख्याती आहे. यापूर्वी रशिया, अमेरिका, हाँगकाँग आणि इजिप्तच्या दौऱ्यादरम्यानही शी जिनपिंग यांच्या ताफ्यात ही कार सामील होती.

सर्वांत सुरक्षित कार

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे देखील विशेष विमान आणि खास बुलेटप्रूफ ‘ऑरस सेनेटर या लिमोझीन मोटारीतून दिल्लीमध्ये आले आहेत. या मोटारीला चालता फिरता किल्ला म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वांत सुरक्षित मोटारीमध्ये तिची गणना होते. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच कारमधून पुतिन यांच्यासोबत प्रवास केला होता. रशियाची सरकारी संशोधन संस्था नामी, सॉलर्स जेएससी आणि संयुक्त अरब अमिरातीची तवाझुन होल्डिंग यांनी एकत्रितपणे ही मोटार तयार केली आहे. या बुलेटप्रुफ मोटारीमध्ये ॲक्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन सोडून बाहेर गेल्याचा इशारा देणारी यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल आणि अत्याधुनिक ब्रेक सिस्टिम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT