BRICS Summit 2026: पहलगाम हल्ल्याची BRICS देशांकडून गंभीर दखल; संयुक्त घोषणापत्रात दिले मोठे संकेत

BRICS Summit 2026: भारताच्या नेतृत्वाखाली यंदाच्या ब्रिक्स परिषदेचं नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत भारतातील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा झाली.
Brics Summit 2026 : At Bharat Mandpam
Brics Summit 2026 : At Bharat Mandpam
Published on
Updated on

BRICS Summit 2026: भारताच्या नेतृत्वाखाली यंदाच्या ब्रिक्स परिषदेचं नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत भारतातील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर एकूणच चर्चेअंती संयुक्त घोषणापत्रात या हल्ल्याचा निषेध करताना आणि दहशतवादी कारवायांबाबत मोठे संकेतही देण्यात आले आहेत.

ब्रिक्स परिषदेच्या सदस्य देशांकडून एकत्रित घोषणापत्र सादर करण्यात आलं. या घोषणापत्रात भारत, रशिया, चीनसह ११ देशांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. याला भारताची मोठ्या कुटनीतीचा विजय मानला जात आहे. या घोषणापत्रानुसार, ब्रिक्स देशांनी सर्व स्वरुपातील दहशतवाद आणि त्याच्या पद्धतींची कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. याचा हेतू, ठिकाण आणि ते दहशतवादी कृत्य घडवून आणणारा कोणीही असला तरी त्याविरोधात कडक पावलं उचलली जावीत यावेळी म्हटलं गेलं.

Brics Summit 2026 : At Bharat Mandpam
Vilas Ghule Death Case: खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाच्या अटकेसाठी बीड-केज महामार्ग रोखला! विलास घुलेचे नातेवाईक आक्रमक

घोषणापत्रात सीमेपलिकडचा दहशतवाद, दहशतवादासाठी फंडिंग आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळण्यासारख्या समस्यांशी निपटण्याचा संकल्प करण्यात आला. त्याचबरोबर या गोष्टीवर भर दिला गेला की, दहशतवादाला कोणताही धर्म, राष्ट्रीयत्व आणि संस्कृती या जातीय समूहाशी जोडला जाता कामा नये.

दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स'

ब्रिक्स देशांनी दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरणं अवलंबलं आहे. यामध्ये सहभागी लोकांची जबाबदारी निश्चित करणे आणि संयुक्त राष्ट्रांच्यावतीनं घोषित सर्व दहशतवादी संघटनांच्याविरोधात ठोस कारवाई करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ब्रिक्स देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या रचनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दहशतवादावर व्यापक कराराला लवकरच अंतिम रुप देण्याची आणि ते स्विकारण्याची देखील मागणी केली आहे.

Brics Summit 2026 : At Bharat Mandpam
Assembly Election news : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी; ममतादीदींची प्रतिष्ठा पणाला, भाजपचा डाव फसणार की गड मजबूत होणार?

या घोषणापत्रात पुढे असंही म्हटलं की, शांतता, अधिक प्रतिनिधीत्वाची आणि निष्पक्ष आंतरराष्ट्रीय व्यवस्था, सुधारित बहुपक्षीय तंत्र, सतत विकास आणि समावेशक विकासाला प्रोत्साहन देत आपल्या लोकांच्या हितासाठी आपलं राजकीय सहकार्य वाढवण्याचा संकल्प करत आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com