Putin Drone Strike : Russia Ukraine War :  Sarkarnama
देश

Putin Drone Strike : ड्रोनहल्ल्यातून थेट पुतीनच्या घरावर स्फोट; रशिया देणार जशास तसे प्रत्युत्तर?

Russia Ukraine War : "या हल्ल्याला आम्ही दहशतवादी हल्ला मानतो. "

सरकारनामा ब्यूरो

Putin Drone Strike : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचं वास्तव्य असणाऱ्या निवासस्थानावर युक्रेनकडून (Ukraine) हल्ला करण्यात आला, असा दावा करण्यात येत आहे. मात्र याबाबत अजूनही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान रशियाच्या सरकारने दावा केला आहे की, या हल्ल्यानंतर पुतिन सुरक्षित आहेत त्यांच्या रोजच्या वेळापत्रकामध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही. (Latest Marathi News)

क्रेमलिनला लक्ष्य केले :

राष्ट्रपती पुतीन यांच्याकडे वैयक्तिक माध्यम विभाग अस्तित्वात आहे. याला प्रेसिडेंट प्रेस सर्व्हिस असे संबोधण्यात येते. प्रेस सर्व्हिसने दावा केल्यानुसार, मंगळवार आणि बुधवारीच्या मध्यरात्री क्रेमलिनवर ड्रोनच्या साहाय्याने हल्ला घडवण्यात आला. यात पुतीन यांना कोणतीही इजा झालेली नाही. त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांच्या कामकाजात कसलाही व्यत्यय आलेला नाही. मात्र या हल्ल्ल्याला आम्ही दहशतवादी हल्ला मानत आहोत.

पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांची ही याबाबत प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, "हल्ला घडून आला, त्यावेळी पुतिन त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. ड्रोनच्या साहाय्याने हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रपती राजधानी मॉस्कोच्या शासकीय निवासस्थानी आहेत. तेथूनच ते काम करत आहेत.

परेड वेळेवर पार पडेल :

रशियात प्रतिवर्षी 9 मे या दिवशी विजय दिवस परेड आयोजित केले जाते. याबाबत पेस्कोव्ह म्हणाले, 'आम्ही अशा हल्ल्यांना घाबरत नाही. विजय दिन परेड आयोजित केल्याप्रमाणे, सर्वे नियोजनासह पार पाडली जाईल.

हल्ला कसा केला गेला ?

प्राप्त माहितीनुसार, हा हल्ला घडवून आणण्यासाठी 2 ड्रोनचा वापर करण्यात आला. रशियाने आपली यंत्रणा कामाला लावून, रडार आणि ट्रॅकिंग सिस्टीमने या ड्रोनचा शोध घेतला. आता रशियाकडून याला जशास तसे प्रत्युत्तर देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT