Bjp News : सहा महिन्यापुर्वी पक्षात, निवडणुकीत पडले, तरी चिटणीसपद ; निष्ठावंतामध्ये नाराजी..

Marathwada : महत्वाची पदं उपऱ्यांना आणि निष्ठावतांची बोळवण केली जात असल्याच्या भावना पदाधिकाऱ्यांमधून उमटत आहेत.
Bjp News, Marathwada
Bjp News, Marathwada Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. परंतु यामध्ये भाजपमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांपेक्षा उपऱ्यांनाच मानाचे पान दिले जात असल्याचा सूर दबक्या आवाजात निघत आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपुर्वी काॅंग्रेसमधून पक्षात आलेले, उमेदवारी मिळवून पराभूत झालेले किरण पाटील यांना आता थेट चिटणीस पद बहाल करण्यात आले आहे.

Bjp News, Marathwada
Protest For Maratha Resrvation News : ओबीसीतून आरक्षण द्या, नाहीतर तेलंगणात जाण्याची परवानगी द्या..

बावनकुळे यांनी बुधवारी (ता.३) प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य, चिटणीस, सरचिटणीस कार्यकारिणी जाहिर केली. (Bjp) मात्र यात निष्ठावंतांना डावलत बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याचे बोलले जाते. महत्वाची पदं उपऱ्यांना आणि निष्ठावतांची बोळवण केली जात असल्याच्या भावना पदाधिकाऱ्यांमधून उमटत आहेत. (Marathwada) त्यामुळे भाजपच्या शहर व जिल्हा कार्यकारणीत प्रदेशाचाच कित्ता गिरवला जाणार का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जाहीर केलेल्या जम्बो कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीसपदी संजय केणेकर, तसेच देविदास राठोड, सुरेश बनकर आणि काँग्रेस पक्षातून ऑक्टोबरमध्ये भाजपमध्ये दाखल झालेले व शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक हरलेले किरण पाटील यांना चिटणीसपद देण्यात आले. प्रदेश उपाध्यक्षपदी अजित गोपछेडे, एजाज देशमुख यांची निवड करण्यात आली. तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्यांत साधना सुरडकर, बसवराज मंगरुळे, डॉ.जगन्नाथ गव्हाणे यांचा समावेश आहे.

पक्षातील निष्ठावंत असलेल्या भगवान घडामोडे, एकनाथ जाधव, अनिल मकरिये, दिलीप थोरात, प्रशांत देसरडा, किशोर शितोळे, सांडू पाटील लोखंडे, नामदेवराव गाडेकर, किशोर धनायत यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली. तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह प्रमोद राठोड, अनुराधा चव्हाण यांचाही विशेष निमंत्रित सदस्य म्हणून कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे.

प्रदेशाच्या कार्यकारिणीत पक्षाचे तीन दशकाहून अधिक काम करणाऱ्यांना चिटणीस पद मिळेल, अशी अपेक्षा बाळणाऱ्यांना मात्र विशेष निमंत्रित पदे देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. आता वर्षभरापासून रखडलेल्या शहर कार्यकारिणीत अनेकजण पद मिळवण्यासाठी धडपड करीत आहेत. यात निष्ठेने काम करणाऱ्यांना चिटणीस पद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com