Rahul Gandhi sarkarnama
देश

Rahul Gandhi News : बालेकिल्ल्यातच राहुल गांधींवर नाराजी, 'जय श्रीराम'च्या घोषणेनंतर हात जोडून फिरले माघारी

Raebareli Loksabha : गावात रस्ता झाल्या नसल्यामुळे गावकरी नाराज झाले होते. राहुल गांधी यांनी रस्ता करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर निम्मा गावकऱ्यांनी मतदान करण्यास होकार दर्शवला.

Roshan More

Lok Sabha Elections 2024 : आपला अमेठी मतदारसंघ सोडून राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून लढत आहेत. आज (सोमवारी) रायबरेलीसाठी Raebareli Loksabha मतदान झाले. मात्र, रायबरेली मतदारसंघातील मिल एरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैनुपूर गावतील मतदानावर मतदारांनी बहिष्कार टाकला. गावऱ्यांची समजूत काढण्यासाठी राहुल गांधी तेथे गेले. मात्र, त्यांना हात जोडून तेथून माघारी फिरावे लागले.

राहुल गांधी Rahul Gandhi गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी गेले असता गावकऱ्यांनी 'जय श्री राम' 'हर हर महादेव'च्या घोषणा देण्यास सुरवात केली. गावकरी राहुल यांचे म्हणणे न ऐकताच घोषणा देत होते. घोषणा सुरू होताच राहुल गांधी हात जोडून तेथून माघारी फिरले.

गावात रस्ता झाल्या नसल्यामुळे गावकरी नाराज झाले होते. राहुल गांधी यांनी रस्ता करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर निम्मा गावकऱ्यांनी मतदान करण्यास होकार दर्शवला तर जो पर्यंत रस्ता होत नाही तो पर्यंत मतदान करणार नसल्याचा पवित्रा अर्धा गावकऱ्यांनी घेतला. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी देखील गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील यश आले नाही.

रायबरेली काँग्रेसचा बालेकिल्ला

रायबरेली मतदारसंघ हा काँग्रेस Congress, गांधी घराण्याचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून गांधी परिवारातील व्यक्त जिंकूण येत आहे. सोनिया गांधी या येथून विद्यमान खासदार आहेत. राज्यसभेवर निवडून गेल्याने त्यांनी हा मतदारसंघ सोडला. येथून प्रियांका गांधी लढतील, अशी चर्चा होती. मात्र, राहुल गांधी यांचे नाव निश्चित करण्यात आले. केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढलेले असताना ही राहुल गांधी यांनी पुन्हा येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT