Raghav Chadha reacts after AAP action linked to Arvind Kejriwal. Watch his Rajya Sabha response video and latest political controversy. Sarkarnama
देश

Raghav Chadha : राघव चड्ढा यांचा पहिल्यांदाच केजरीवालांवर प्रहार; थेट इशाराच दिला, मी शांत आहे, याचा अर्थ...

Raghav Chadha vs Arvind Kejriwal AAP Controversy : आम आदमी पक्षाने गुरूवारी चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवलं, शिवाय राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहित त्यांना राज्यसभेत बोलण्यासाठी पक्षाचा वेळ देऊ नये, असं देखील सांगितलं. त्यानंतर पक्षाने चड्ढा यांच्याबाबत असा निर्णय का घेतला याची चर्चा सबंध देशभरात सुरू आहे.

Jagdish Patil

Delhi News, 03 Apr : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांची पक्षाने राज्यसभेतील उपनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी प्रथमच या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे. चड्ढा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत पक्षाने केलेल्या कारवाईवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

आम आदमी पक्षाने गुरूवारी चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवलं, शिवाय राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहित त्यांना राज्यसभेत बोलण्यासाठी पक्षाचा वेळ देऊ नये, असं देखील सांगितलं. त्यानंतर पक्षाने चड्ढा यांच्याबाबत असा निर्णय का घेतला याची चर्चा सबंध देशभरात सुरू आहे.

या चर्चा सुरू असतानाच आता कारवाईच्या दुसऱ्या दिवशी राघव चड्ढा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. शिवाय आपल्या बोलण्यावर बंदी घालणाऱ्या आम आदमी पक्षाला त्यांनी इशाराही दिला आहे. त्यामुळे आगामी काळात चढ्ढा यांची राजकीय भूमिका नेमकी काय असणार? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

राघव चड्ढा यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे की, "मला जेव्हा संसदेत बोलायची संधी मिळते, तेव्हा मी लोकांचे प्रश्न मांडतो. मी मांडलेले विषय असे असतात जे सामान्यपणे संसदेत मांडले जात नाहीत. पण मग लोकांचे असे प्रश्न सभागृहात मांडणं गुन्हा आहे का? मी काही चूक केली का? मी हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण आम आदमी पक्षानं राज्यसभा सचिवालयाला असं कळवलं आहे की माझ्या संसदेतील बोलण्यावर निर्बंध घालण्यात यावेत.

आता माझ्या बोलण्यावर कुणाला बंदी घालावीशी का वाटली? असा सवाल त्यानी आम आदमी पक्षाला विचारला आहे. ते पुढे म्हणाले, मी संसदेत सामान्य माणसाचे मुद्दे मांडले. विमानतळावरील अन्नपदार्थांच्या प्रचंड किंमती असो वा झोमॅटो-ब्लिंकइटच्या डिलीव्हरी रायडर्सचा मुद्दा, जेवणातील भेसळीचा मुद्दा असो वा टोल प्लाझावरील लूट किंवा टेलिकॉम कंपन्या 12 महिन्यांत 13 वेळा आपल्याला रिचार्ज करायला लावतात असे अनेक मुद्दे मी संसदेत मांडले.

ज्यामुळे देशातील सामान्य जनतेचा फायदा झाला. पण आम आदमी पक्षाचं काय नुकसान झालं? असं म्हणत मला बोलण्यापासून का थांबवलं जातंय. माझा आवाज का दाबला जातोय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसंच यावेळी त्यांनी जनतेनं मला खूप प्रेम दिलं. मी जेव्हा जनतेचे प्रश्न मांडतो, तेव्हा तुम्ही मला पाठिंबा देता. मी तुम्हाला थँक यू म्हणतो. मला अशीच साथ देत राहा. मी तुमच्यातलाच एक आहे, असं आवाहन त्यांनी देशभरातील जनतेला केल.

शिवाय यावेळी त्यांनी आपला इशारा देखील दिला आहे. ज्या लोकांनी आज माझा संसदेत बोलण्याचा अधिकार काढून घेतला, त्यांना मी सांगू इच्छितो की, 'मेरी खामोशी को मेरी हार ना समझ लेना, मैं वो दरिया हूँ, जो वक्त आने पर सैलाब बनता है', अशा शेरोशायरीतून त्यांनी आम आदमी पक्षाला आणि पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सूचक इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT