Raghav Chadha Removed : 'आप'च्या कारवाईनंतर राघव चड्ढा यांची पहिली पोस्ट; 'तो' व्हिडिओ शेअर करत पुन्हा घातला थेट मुद्द्याला हात

Raghav Chadha Rajya Sabha Controversy : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना त्यांच्या पक्षाने राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवलं आहे. शिवाय त्यांना सभागृहात बोलण्यासाठी पक्षाचा वेळ देऊ नये, अशी विनंती करणारं पत्र देखील 'आप'ने राज्यसभा सचिवालयाला दिलं आहे. 'आप'च्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Raghav Chadha
Raghav Chadha addressing key public issues in Rajya Sabha, highlighting concerns like mobile data pricing, insurance GST, and delivery workers’ rights.Sarkarnama
Published on
Updated on

Raghav Chadha Removed : मोबाईल वापरणाऱ्या जेन-झी पासून ते डिलिव्हरी बॉयपर्यंत सर्वांना ज्यांच्या भाषणांनी भुरळ घातली होती, असे आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना त्यांच्या पक्षाने राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवलं आहे. शिवाय त्यांना सभागृहात बोलण्यासाठी पक्षाचा वेळ देऊ नये, अशी विनंती करणारं पत्र देखील 'आप'ने राज्यसभा सचिवालयाला दिलं आहे.

'आप'च्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे पक्षाने उपनेते पदावरून हटवताच राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत राज्यसभेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

राघव चड्ढा या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत राज्यसभेत बोलताना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला त्याचे काही शॉर्ट्स एकत्र केले आहेत. यामध्ये मध्यमवर्गाशी संबंधित विविध प्रश्नांचा समावेश आहे. ज्यामध्ये मोबाईल डेटासाठी जेवढे पैसे घेतले जातात, तेवढा डेटा लोकांना वापरू दिला पाहिजे. तो एक्सपायर होऊ नये, अशी मागणी करताना दिसत आहेत.

तसंच वायू प्रदूषणाचा सर्व दोष शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. तसंच त्यांनी सरकारकडे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स यावर जीएसटी लावू नये. हे काही लक्झरी प्रॉडक्ट्स नाहीत, अशी मागणी केल्याच्या व्हिडिओचा देखील समावेश आहे.

Raghav Chadha
Raghav Chadha Removed : 'आप'ने खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवलं, राज्यसभेत बोलण्यावरही घातली बंदी

तर याच ट्विटमध्ये पुढे त्यांनी विमानतळावरील जेवणाच्या किंमतीवर आळा घालावा तिथे प्रचंड महाग जेवण मिळते, त्यावर सरकारने नियंत्रण आणावे. यासह झोमॅटो आणि स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजचे प्रश्न देखील त्यांनी सभागृहात मांडले होते. त्यांनी हेच सर्व लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे जे सभागृहात मांडले होते ते सर्व एका व्हिडिओद्वारे एक्सवर शेअर केले आहेत.

त्यामुळे पक्षाने त्यांना उपनेते पदावरून हटवलं असलं तरी त्यांनी आपण लोकांसाठी नेमकं काय बोललो हे दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. आम आदमी पक्षाने खासदार राघव चड्ढा यांची पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवत त्यांच्या जागी पंजाबचे अशोक मित्तल यांची नियुक्ती केली आहे. राज्यसभा सचिवालयाला एका पत्राद्वारे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

या पत्रातून राघव चड्ढा यांना राज्यसभेत बोलण्यासाठी पक्षाचा वेळ देऊ नये, असेही नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता आप आणि चड्ढा यांच्यातील दुरावा ठळकपणे दिसून आला आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, राघव चड्ढा यांची भाजपशी वाढती जवळीक आणि पक्षातील महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी बाळगलेले मौन, यासह पक्षाच्या बैठकांना सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर पक्षातील वरिष्ठ नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

Raghav Chadha
Gokul Election Politics : मुश्रीफ गटाच्या पडद्यामागच्या हालचाली ओळखल्या, अदृश्य शक्तीने एका रात्रीत सूत्रं हलवली

सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात न्यायालयाने आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोर्टाने दोषमुक्त केले. यावर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. मात्र, यावर आपचेच खासदार असलेल्या राघव चड्ढा यांनी एक शब्दही उच्चारला नव्हता. तेव्हाच सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

अशातच आता त्यांना थेट उपनेते पदावरून हटवल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, चड्ढा यांची २०२३ मध्ये उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मागील आठवड्यात आपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या स्टार प्रचारकांच्या यादी जाहीर केली. या यादीती चड्ढा यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. तेव्हापासून चड्ढा आणि आप पक्षाचं काहीतरी बिनसल्याचं बोललं जात होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com