Political defection India : राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी अन्य सहा खासदारांसह आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी संविधानातील तरतुदींच्या आधारे दोन तृतियांश सदस्यांचा गट करत तो भाजपमध्ये विलीन केला. राज्यसभेच्या सभापतींनी या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हे सातही खासदार भाजपचे सदस्य बनले आहेत.
राघव चड्ढा यांनी ज्या तरतुदींचा आधार घेतला आहे, त्यामध्ये बदल करण्याचे विधेयक चार वर्षांपूर्वी त्यांनी राज्यसभेत सादर केले होते. खासगी बिलाच्या माध्यमातून त्यांनी पक्षांतरबंदीबाबत मोठा बदल सुचविली होता. हे विधेयक पारित झाले असते तर चड्ढा यांच्यासह सर्व सात खासदारांना भाजपमध्ये प्रवेश करता आला नसता.
नेमकं काय होतं विधेयक?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये २०२२ मध्ये राघव चड्ढा यांनी राज्यसभेत एक घटनादुरुस्ती विधेयक सादर केले होते. हे विधेयक पक्षांतरविरोधी कायदा म्हणजे घटनेतील दहाव्या परिशिष्टाशी संवंधित होते. पक्षाने व्हीप बजावल्यानंतर एखादा सदस्य सात दिवस उपस्थित न राहिल्याची त्याची ही कृती स्वेच्छने सदस्यता सोडल्याचे मानले जाईल, असे प्रस्ताव विधेयकात होते.
व्हीप हा केवळ विश्वासदर्शक ठराव आणि अविश्वासदर्शक ठरावापुरतेच मर्यादित केले जावे, त्याचप्रमाणे एखाद्या पक्षात विलीन होण्यासाठीची आवश्यक संख्या दोन तृतियांश याऐवजी तीन चतुर्थांश केली जावी आणि त्यावर अध्यक्षांनी अधिकाधिक तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, असेही विधेयकात प्रस्तावित करण्यात आले होते.
राघव चड्ढा यांनी त्यावेळी रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि घोडेबाजारावरही प्रहार केला होता. या गोष्टी लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले होते. सध्याच्या कायद्यातील त्रुटींमुळे निवडून आलेले सदस्य जनतेने दिलेला कौल पायदळी तुडवून राजकीय फायदा उचलत असल्याचेही चड्ढा त्यावेळी म्हणाले होते.
दरम्यान, चड्ढा यांचे हे विधेयक त्यावेळी संमत झाले नाही. त्यामुळे दोन तृतियांश या नियमाचा आधार घेत चड्ढा व इतर सहा खासदार भाजपमध्ये विलीन होऊ शकले. त्यांनी शुक्रवारी सात खासदारांच्या सह्यांचे पत्र राज्यसभेच्या सभापतींकडे दिले होते. त्यानुसार सोमवारी सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.